कोरोनाच्या नावाखाली जमा केलेल्या निधीवर मौजमजा, त्याने खरेदी केली लॅम्बोर्गिनी आणि..

कोरोनाच्या नावाखाली जमा केलेल्या निधीवर मौजमजा, त्याने खरेदी केली लॅम्बोर्गिनी आणि..

hotel/ car

कोरोना व्हायरसमुळे कोट्यवधी लोकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे तर या काळात प्रचंड हाल झाले. दोन वेळच्या जेवणाचे ही त्यांचे चांगलेच हाल झाले. पण अमेरिकेत एका व्यक्तीला कोरोना रिलीफ प्रोग्रामअंतर्गत २९.८ कोटी रुपये मिळाल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर त्या व्यक्तीने उधळपट्टी करायला सुरुवात केली. या व्यक्तीला शुक्रवारी अटक करण्यात आली होती. मात्र मंगळवारी त्याला कोर्टाकडून जामीन मिळाला आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहणाऱ्या डेव्हिड हिन्सवर बँकेच्या घोटाळ्याचा आरोप आहे. कोरोना रिलीफ प्रोग्राममधून त्याने कोट्यावधी रुपये किंमतीच्या लॅम्बोर्गिनी कार आणि इतर लक्झरी वस्तू खरेदी केल्या आहेत. इतकच नाही तर त्याने याच पैशाने महागड्या हॉटेल्समध्ये मुक्काम देखील केला आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांनी असा आरोप केला आहे की २९ वर्षीय व्यक्तीने बँकेची फसवणूक केली. सुरुवातीला या तरूणाने विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्याच्या नावाखाली सरकारकडून १३५ दशलक्ष डॉलर्स मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु तपासणी दरम्यान असे आढळले की बरेच कर्मचारी बनावट होते आणि कित्येकांचे वेतन हे नमूद रकमेपेक्षा बरेच कमी होते. तथापि, बँकेने यापूर्वीच ३९ लाख डॉलरला मान्यता दिली आहे.

स्पोर्ट्स कारचा झालेल्या एका अपघातानंतर अधिकाऱ्यांनी त्या तरूणाविरूद्ध तपास सुरू केला. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.


हे ही वाचा – सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, मुंबईत सोन्याच्या दराने गाठला उच्चांक!


 

First Published on: July 28, 2020 6:21 PM
Exit mobile version