कोरोना काही जाईना चला, त्याच्याबरोबरच जगायची आता तयारी करूयात!

कोरोना काही जाईना चला, त्याच्याबरोबरच जगायची आता तयारी करूयात!

कोरोनाचा प्रसार थांबावा यासाठी सरकार वेगवेगळे प्रयोग करत आहे. देशात लॉकडाऊनही जाहीर करण्यात आला आहे. तरी कोरोना रूग्णांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दिवसागणीक सरकारच्या आणि पर्यायाने लोकांच्या चिंतेत वाढ होत चालली आहे. दिल्लीतील एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी चिंतेत भर टाकणारं एख वक्तव्य केलं आहे.

एम्सचे संचालक रणदीप गुलेरीया म्हणाले, कोरोनाची सद्यस्थिती बघता आपल्याला कोरोना सोबतच जगावे लागणार आहे. तसेच जून महिन्यात भारतात सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण आढळतील. अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या रूग्णांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवणही शक्य झाल्याचं ते म्हणाले.

जून महिन्यात सर्वाधिक रूग्ण

सध्याची परिस्थीती बघता जून महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आढळतील. हा आजार झटपट संपून जाणार नाही. आपल्याला कोरोना सोबतच रहावे लागेल. हळूहळू कोरोना रूग्णांची संख्या कमी होत जाईल.

लॉकडाऊनचा फायदाच

देशात वेळेवर घेतलेल्या लॉकडाऊनचा फायदाच झाला आहे. त्यामुळे देशात मोठ्याप्रमाणावर कोरोनाचा फैलाव झालेला नाही. रूग्णालयाने लॉकडाऊनमध्ये पुरेशी तयारी करून ठेवली आहे. पीपीई किट्स, व्हेंटीलेटर याची पुरेशी व्यवस्था रूग्णालयात आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.


हे ही वाचा – लॉकडाऊन लग्न! अरुण गवळींची मुलगी मराठी अभिनेत्यासोबत बांधणार लग्नगाठ!


 

First Published on: May 7, 2020 9:31 PM
Exit mobile version