देशात कोरोनाचा विस्फोट! नव्याने १ लाख ४५ हजार नव्या रुग्णांची नोंद

देशात कोरोनाचा विस्फोट! नव्याने १ लाख ४५ हजार नव्या रुग्णांची नोंद

Corona Update: देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, तर मृतांचा आकडाही झाला कमी

देशात वाढत्या कोरोना संसर्गामुळे अनके राज्यांमध्ये कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र तरीही रुग्णांसख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या २४ तासामध्ये देशात १ लाख ४५ हजार ३४८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा देखील घडकी भरवणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ७९४ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले.

तर देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ३२ लाख ०५ हजार ९२६ इतकी झाली आहे. तर गेल्या २४ तासात ७७ हजार ५६७ रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या १ कोटी १९ लाख ९० हजार ८५९ वर पोहचली आहे. मागील २४ तासात देशात कोरोनामुळे ७९४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्य़ा रुग्णांची संख्या १ लाख ६८ हजार ४३६ इतकी झाली आहे. देशात सध्या १० लाख ४६ हजार ६३१ सक्रिय रुग्ण आहेत. तर ९ कोटी ८० लाख ७५ हजार १६० नागरिकांना लस देण्यात आली आहे.त्यामुळे एकूण रुग्णसंख्या पाहता देशात कोरोनाची दुसरी लाट निर्माण झाली असून गेल्या वर्षीच्या तुलने हा आकडा अधिक मोठा आहे.

यात गेल्या दोन महिन्यातील सर्वाधिक रुग्णांची नोंद शुक्रवारी करण्यात आली आहे. शुक्रवारी देशात १ लाख ३१ हजार ९६८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली तर एकूण मृत्यूंची संख्या ७८० वर पोहचली. तर शनिवारीला या रुग्णसंख्येने रेकॉर्डब्रेक केले. शनिवारी देशात १ लाख ४५ हजार ३८४ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ७९४ झाली आहे.


 

First Published on: April 10, 2021 2:29 PM
Exit mobile version