CoronaVirus: चिंताजनक! जगातील मृतांचा आकडा ९० हजारहून अधिक!

CoronaVirus: चिंताजनक! जगातील मृतांचा आकडा ९० हजारहून अधिक!

जगातील वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे मृतांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत जगातील १५ लाख ७० हजार १०६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांचा आकडा ९० हजारहून अधिक झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ९४ हजार ४९७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे दोन हजार लोकांचे मृत्यू झाले असून आतापर्यंत अमेरिकेतील मृतांचा आकडा १६ हजार पार झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ncov2019.live या वेबसाईटनुसार ही माहिती दिली आहे.

मृत्यूच्या संख्येत घट

संपूर्ण जगात वेगाने पसरणाऱ्या या महामारीमुळे सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. त्यापाठोपाठ स्पेनचा दुसरा आणि अमेरिका तिसरा क्रमांक आहे. इटलीमध्ये आतापर्यंत १८ हजार २७९ जणांचा बळी गेला आहे. तर स्पेनमध्ये १५ हजार २८३ जण कोरोनामुळे मरण पावले आहे. मात्र गेल्या दोन दिवसांत येथील मृत्यूच्या संख्येत घट झालेली दिसत आहे.

न्यूयॉर्कमध्ये निम्माहून अधिक मृत्यू

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये निम्माहून अधिक मृत्यू होत आहेत. कोरोना व्हायरसचे न्यूयॉर्क हे केंद्र आहे. आतापर्यंत न्यूयॉर्कमध्ये एकूण ७ हजार ६७ जणांचे बळी गेले आहेत. तसंच १ लाख ५९ हजार ९३७ जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत.

फ्रान्समध्ये २४ तासात ५४१ जणांचा मृत्यू

गेल्या २४ तासात अमेरिकेत ३२ हजार नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. अमेरिकेतील एकूण कोरोनाग्रस्तांचा संख्या स्पेन आणि इटलीपेक्षा तिप्पट आहे. आतापर्यंत अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आकडा ४ लाख ५५ हजार ४५४ इतका आहे. तर स्पेनचा १ लाख ५२ हजार ४४६ आणि इटलीचा १ लाख ४३ हजार ६२६ कोरोनाग्रस्तांचा आकडा आहे. फ्रान्समध्ये गेल्या २४ तासात ५४१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मृतांचा आकडा १२ हजार २१०वर पोहोचला आहे. जगभरातील ही परिस्थितीत पाहता कोरोनामुळे आणखीचे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.


हेही वाचा – CoronaVirus: लाखो रुपयांचा किराणा माल चोरल्यामुळे महिलेला अटक!


 

First Published on: April 10, 2020 12:16 AM
Exit mobile version