Corona: रशियाने जर्मनी आणि फ्रान्सला टाकले मागे; २४ तासांत ११ हजार २३१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Corona: रशियाने जर्मनी आणि फ्रान्सला टाकले मागे; २४ तासांत ११ हजार २३१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

कोरोना विषाणू

जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. जगातील कोरोनाबाधित संख्या ३८ लाखांवर पोहोचला आहे. गुरुवारी रशियात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ७७ हजार १६०वर  पोहोचली आहे. दरम्यान रशियातील कोरोना विषाणू प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. जगातील कोरोनाच्या यादीत रशिया आता पाचव्या क्रमांकावर आलेला आहे. रशियाने जर्मनी आणि फ्रान्सला देखील मागे टाकले आहे. रशियाच्या कोरोना व्हायरस टास्कफोर्सने सांगितलं आहे की, गेल्या २४ तासांत ११ हजार २३१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे.

देशात इतर शहरांच्या तुलनेत राजधानी मॉस्को मध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. रशियात मॉस्को हे कोरोनाचे केंद्र बनले आहे. गुरुवारी मॉस्कोमध्ये रात्रभरात ६ हजार ७०३ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. कोरोना व्हायरस टास्कफोर्सने सांगितलं आहे की, इतर देशांच्या तुलनेत रशियातील मृतांचा आकडा कमी आहे. काल रात्री ८८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांचा आकडा १ हजार ६२५ वर पोहोचला आहे.

मॉस्कोचे महापौर सर्जिये सोब्यानिन यांनी बुधवारी सांगितलं की, कोरोनाची चाचणी करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ४८ लाखांहून अधिक जणानांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे, असा दावा रशियाने केला आहे.

दरम्यान राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी बुधवारी महापौर सर्जिये सोब्यानिन यांच्या लॉकडाऊन नियम शिथील करण्याच्या आदेशाला पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये काही औद्योगिक संस्थांना काम सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

मॉस्कोसह इतर रशियातील शहरातील लॉकडाऊनचा हा सहावा आठवडा आहे. अशा परिस्थितीत मॉस्कोतील नागरिकांना अन्न आणि औषध विकत घेण्यासाठी घरा बाहेर पडण्यास परवानगी दिली आहे. तसंच सार्वजनिक किंवा खासगी वाहतुकीद्वारे कोठेही प्रवास करण्यासाठी त्यांना डिजिटल परवानगी घेणे आवश्यक आहे.


हेही वाचा – LockDown: … आणि बाळाच्या लसीकरणाची व्यवस्था मातेला दिली करून


 

First Published on: May 7, 2020 7:58 PM
Exit mobile version