CoronaVirus: कोरोना पसरण्यापुर्वी चीनच्या वुहान लॅबमधली धक्कादायक माहिती उघडकीस, चीनवर संशय बळावला

CoronaVirus: कोरोना पसरण्यापुर्वी चीनच्या वुहान लॅबमधली धक्कादायक माहिती उघडकीस, चीनवर संशय बळावला

CoronaVirus: कोरोना पसरण्यापुर्वी चीनच्या वुहान लॅबमधली धक्कादायक माहिती उघडकीस, चीनवर संशय बळावला

जगात नोव्हेंबर २०१९ पासून म्हणजेच मागील दीड वर्षांपासून कोरोना विषाणूने हाहाकार घातला आहे. संपुर्ण जगामध्ये कोरोना वायरस पसरला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अमेरिका, भारत, ब्राझील या देशांना अधिक फटका बसल्याचे कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवरुन दिसत आहे. परंतु ज्या शहरातून कोरोनाचा प्रसार झाला ते चीनमधील वुहान शहरात कोरोनाचा आता काही संसर्गच नसल्याचे चित्र आहे. कोरोना विषाणूचा प्रसार कसा झाला याची निर्मिती कशी झाली यावर अद्याप कोणत्याही देशाला ठोस माहित मिळाली नाही. परंतु कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण हा चीनमधील वुहान प्रांतात आढळला होता. वुहानच्या लॅबमधून कोरोनाची उत्पत्ती आणि प्रसार झाला असल्याचे जगातील देशांना संशय आहे. या लॅबबाब धक्कादायक माहिती अमेरिकेच्या एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीमुळे जगभरात खळबळ माजली आहे. या वृत्तानुसार चीनच्या वुहान लॅबमधून कोरोनाचा प्रसार झाला असल्याचे समजते आहे. दीड वर्षापुर्वी वुहानच्या ज्या लॅबमधून कोरोनाचा प्रसार झाला त्या वुहना इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी लॅबमधील ३ संशोधक आजारी पडले होते. हे संशोधक गंभीर आजारी पडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबद्दलची माहिती अमेरिकन वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या खुलाशामुळे संशय बळावला

कोरोना पसरण्यास चीन जबाबदार असल्याचे अमेरिकेसह अनेक देशांनी म्हटले होते. अमेरिकेने कोरोना वायरसला चीन वायरस असेही म्हटले होते. वुहान शहरातच पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. कोरोनाची निर्मिती कुठे झाली याबाबत जागतिक आरोग्य संघटना शोध घेत आहे. यावर चर्चा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची बैठक होणार होती परंतु त्या बैठकीपुर्वीच चीनच्या लॅबविषयी माहिती समोर आल्याने जगात खळबळ माजली आहे. वुहानमधील लॅबमधून कोरोना विषाणू सोडण्यात आला असल्याचा संशय आता अनेक देशांना आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे पथक काही महिन्यांपूर्वी वुहानला गेले होते. या पथकाने कोरोनाचा उगम कुठे झाला आहे. त्याचा प्रसार कसा झाला याचा शोध घेत होते. परंतु या पथकाला लॅबमधून कोरोना विषाणू कसा पसरला याचा काही पुरावा मिळाला नाही. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाच्या प्रसार होण्यासाठी नेहमीच चीनला जबाबदार ठरवले आहे. तसेच अमेरिकेचे एक पथक चीनमघ्ये कोरोना विषाणूचा प्रसार कसा झाला यावर शोध घेत आहे.

First Published on: May 24, 2021 11:15 AM
Exit mobile version