या तीन राज्यांमध्ये परिस्थिती बिकट; लक्ष न दिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल

या तीन राज्यांमध्ये परिस्थिती बिकट; लक्ष न दिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल

महाराष्ट्र आणि गुजरातकडे सर्वांचं लक्ष लागून आहे कारण कोरोना विषाणूची सर्वाधिक प्रकरणे या देन राज्यांमध्ये आहेत. महाराष्ट्रात कोरोना संक्रमणाची संख्या १०,००० च्या वर गेली आहे. महाराष्ट्रात ४५९ लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, गुजरात हे भारतातील दुसरे असे राज्य आहे जिथे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरला आहे. गुजरातमधील कोरोनाची प्रकरणे ४००० च्या वर गेली आहेत, तर २१४ लोक मरण पावले आहेत. पण आता परिस्थिती अधिक गंभीर बनताना दिसत आहे. बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल हे महाराष्ट्र आणि गुजरात नंतर कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट ठरू शकतील कारण या राज्यात संक्रमितांची संख्या अचानक वाढली आहे. चेन्नईच्या गणित विज्ञान संस्थेच्या (आयएमएससी) आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये २९ एप्रिलपर्यंत या तीन राज्यात एकूण १,२०० रुग्ण आढळले आणि या राज्यांमध्ये कोरोना संसर्गाचा वेगग वाढला आहे.

पश्चिम बंगाल महाराष्ट्राच्या पावलांवर पाऊल ठेवतंय

२९ एप्रिल रोजी पश्चिम बंगालमध्ये ६९६ रुग्णांची नोंद झाली, तर अनुक्रमे बिहार आणि झारखंडमध्ये ३८३ आणि १०७ नवीन रुग्ण आढळले. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत तिन्ही राज्यात संसर्ग होण्याचे प्रमाण ४ टक्क्यांहून कमी आहे, तर देशातील ४० टक्के रुग्ण गुजरात आणि महाराष्ट्रात आहेत.


हेही वाचा – Big Breaking: लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवला


पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमध्ये संक्रमणाचे प्रमाण कमी असले तरी या राज्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे मला वाटते. पश्चिम बंगालकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, असं आयएमएससीच्या सीताभारा सिन्हा यांनी सांगितलं. मार्चच्या अखेरीस पश्चिम बंगालची परिस्थिती चांगली होईल असं प्रथम वाटलं पण तसं झालं नाही. मागील तीन आठवड्यांचा विचार केला तर, पश्चिम बंगाल महाराष्ट्राच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचं दिसतंय.

 

First Published on: May 1, 2020 7:17 PM
Exit mobile version