घरCORONA UPDATEBig Breaking: लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवला

Big Breaking: लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवला

Subscribe

गृह मंत्रालयाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये लॉकडाऊनचा कालावधी ४ मे पासून पुढे दोन आठवड्यांसाठी वाढवण्याचा आदेश जारी केला. १८ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. संपूर्ण देशात दोन आठवडे लॉकडाऊन वाढवला आहे. ४ मे ते १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. रेड झोनमधून कुठलीही सवलत देण्यात आलेली नाही. तथापि, ग्रीन झोनमध्ये गृह मंत्रालयाने दिलेली सूट कायम राहील. दरम्यान, रेल्वे सेवा, विमान सेवा देखील बंद राहणार आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशात रेड झोन अंतर्गत १३० जिल्हे, ऑरेंज झोन अंतर्गत २८४ जिल्हे आणि ग्रीन झोन अंतर्गत ३१९ जिल्हे आहेत. दर आठवड्याला त्याचे मूल्यमापन केले जाईल आणि संक्रमित प्रकरणांनुसार झोन बदलले जातील.

- Advertisement -

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -