जगात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका! १२६ देशात बाधितांच्या आकड्यात वाढ, ३३ देशात १०० टक्क्यांहून अधिक रूग्ण

जगात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका! १२६ देशात बाधितांच्या आकड्यात वाढ, ३३ देशात १०० टक्क्यांहून अधिक रूग्ण

जगभरासह देशात कोरोनाने गेल्या दीड वर्षांपासून कहर केला असून जगात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्यस्थितीत कोरोनाच्या तिसर्‍या लाटेने जगातील अनेक देशांमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. जगातील तब्बल १२६ देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची संख्या झपाट्याने वाढू लागली आहेत. जगात असे ३३ देश आहेत ज्यामध्ये दोन आठवड्यांत कोरोनाची रुग्ण संख्या दुप्पट झाली असून या ३३ देशांमध्ये कोरोना बाधितांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर अन्य ३० देशांमध्ये आठवड्यातून ५० ते ९० टक्क्यांपर्यंत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे.

जगातील कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून नेदरलँड्समध्ये गेल्या ७ दिवसांत सर्वाधिक रूग्णा आढळून आले असून २९९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यासह अमेरिकेत आठवड्यातून ६९ टक्के इतकी बाधितांमध्ये वाढ झाली आहे. इंडोनेशियामध्ये गेल्या ७ दिवसांत ४४ टक्के तर थायलंडमध्ये ४७ टक्के आणि इंग्लंडमध्ये ३३ टक्के रूग्ण हे केवळ ७ दिवसांत वाढले असल्याचे सांगितले जात आहे. या देशांमध्ये कोरोना नियमांचे पालन नागरिकांनी न केल्याने बाधितांमध्ये वाढ होण्याचे कारण सांगितले जात आहे. संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान बाधितांमध्ये वाढ होत असून नेदरलँड्स आणि यूकेमध्ये दररोज कोरोनाची सर्वाधिक संख्या नोंदवली जात आहे. या दोन्ही देशांमध्ये दररोज ५० हजार नवे रूग्ण आढळून येत असून दररोज मृत्यूही एक हजारांपर्यंत पोहोचत आहेत. तसेच, ब्राझील आणि अमेरिकेत दररोज ४० हजाराहून अधिक नवीन रूग्ण वाढत असून गेल्या काही दिवसांपासून भारतात ४० हजारांपेक्षा कमी बाधितांची नोंद केली जात आहे.

दरम्यान, देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असून नीति आयोग सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी असे सांगितले की, जग कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या दिशेने जात आहे. पुढचे १००-१२५ दिवस भारतातील कोरोना विरुद्धच्या लढ्यात महत्त्वपूर्ण आहेत. यासह शुक्रवारी डॉ. वीके पॉल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोना लसीचा पहिला डोस कोरोना मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ८२ टक्के प्रभावी आहे. तर कोरोना लसीचे दोन डोस कोरोना मृत्यू रोखण्यासाठी ९५ टक्के यशस्वी आहे.’


India Corona Update: देशात २४ तासात ५६० रुग्णांचा मृत्यू, ३८ हजारांहून अधिक बाधितांची नोंद

First Published on: July 17, 2021 12:55 PM
Exit mobile version