धक्कादायक! कोरोना संशयितांचे क्वॉरंटाइनमध्ये लैंगिक चाळे

धक्कादायक! कोरोना संशयितांचे क्वॉरंटाइनमध्ये लैंगिक चाळे

जगात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर बऱ्याच देशात सोशल डिस्टंसिंगचे निय़म अधिक कडक करण्यात आले आहेत. मात्र, एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे मात्र, धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या ठिकाणी कोरोना संशयितांना ठेवण्यात आले आहे. त्या क्वॉरंटाइन सेंटरमध्ये लैंगिक चाळे केले जात असल्याचे समोर आले आहे. युगांडामधील हा धक्कादायक प्रकार असल्याचे समोर आल्यानंतर सरकारला आता त्याठिकाणी पहारेकरी ठेवण्याची वेळ आली आहे.

‘क्वारंटाइन सेंटरमध्ये ज्या कोरोना संशयिताना ठेवण्यात आले आहे. त्याठिकाणी कोरोना संशयित लैंगिक चाळे करत आहेत. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. एकीकडे कोरोनाशी सामना करण्यासाठी लॉकडाऊन केले आहे, त्यावर पाणी फिरणार आहे’, अशी प्रतिक्रिया युगांडाच्या आरोग्य मंत्रालयाचे सचिव डियाना अटविने दिली आहे.

यामुळे संक्रमण वाढण्याची भिती

युगांडामधील नागरिकांना कोरोनाची भीती नसल्याचे दिसून येत आहे. ज्या कोरोना संशयिताना क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. ते संशयित एकमेकांच्या रुममध्ये जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे क्वॉरंटाइन केलेल्या व्यक्ती मित्रांना आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी हॉटेल आणि इतर ठिकाणी फिरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, या संशयितांवर लक्ष ठेवण्यासाठी पहारेकऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

२३२ लोकांना केले क्वॉरंटाइन

हॉटेल्स, हॉस्पिटल, लॉज आणि युनिवर्सिटीमध्ये आयसोलेशन सेंटर तयार करण्यात आले आहेत. यामध्ये २३२ लोकांना क्वॉरंटाइन करण्यात आले असून ५४ जण कोरोनाबाधित आहेत. तर यामधील ७ लोक बरे झाले आहेत. विशेष म्हणजे युगांडामध्ये एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही.


हेही वाचा – Video: लॉकडाऊन संपवा, ‘घरात पती दिवसरात्र देतोय त्रास’; महिलेची व्यथा


 

First Published on: April 16, 2020 10:33 AM
Exit mobile version