Live Update: पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विष्णू सवरा यांचे दीर्घ आजाराने निधन

Live Update: पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विष्णू सवरा यांचे दीर्घ आजाराने निधन

माजी आदिवासी विकास मंत्री,पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री
विष्णू सवरा यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. उद्या दुपारी 12 वाजता वाडा येथील निवासस्थानातून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.


मुंबईत फोर्ट परिसरात आग, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी

मुंबईत फोर्ट परिसरातील सोमय्या किताब खाना या दुकानाला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सोमय्या किताबखाना हे मुंबईतील प्रसिद्ध पुस्तकांचे दुकान आहे.


महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची पत्रकार परिषद

दिशा कायद्याचा प्रस्ताव विधीमंडळात आणणार असे  यशोमती ठाकूर म्हणाल्या. महिला अत्याचार रोखण्यासाठी हे नवे पाऊल आहे, असेही त्या म्हणाल्या.


ग्लोबल टिचर गुरूजी रणजितसिंह डिसले यांना कोरोनाची लागण

ग्लोबल टिचर गुरूजी रणजितसिंह डिसले यांना कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांची भेट घेतली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचीही त्यांनी भेट घेतली होती.


शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे कोरोना पॉझिटिव्ह. संभाजीनगरच्या सिंग्मा रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.


विरोधकांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची घेतली भेट
राहुल गांधी, शरद पवार यांची राष्ट्रपतींसोबत चर्चा
कृषी कायदे रद्द करा अशी सीताराम येचुरी यांची मागणी.
कृषी कायद्याबाबत योग्य मंथन झाले नाही असे शरद पवार यांनी सांगितले.


दिल्लीत शेतकरी नेत्यांची पत्रकार परिषद सुरू
केंद्र सरकार दिलेल्या प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी फेटाळला. त्यामुळे देशभरात शेतकरी आंदोलन सुरूच राहणार असे त्यांनी म्हटले आहे. १४ डिसेंबरला सर्व बॉर्डवर आंदोलक एकदिवसीय उपोषण करणार.


भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला उद्देशून दानवेंनी केलेल्या या वक्तव्यामुळे हा वाद निर्माण झाला असून यावर आता शेतकरी नेत्यांनी तीव्र आक्षेप आणि संताप व्यक्त केला आहे. ‘दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पाठिमागे चीन आणि पाकिस्तान आहे’, असं वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलं आहे. (सविस्तर वाचा)


नवीन कृषी कायदे मागे घ्या, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र


राज्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘शक्ती कायदा’ येणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिला व बाल अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी शक्ती कायद्याचा मसुदा मंजूर होण्याची शक्यता आहे. महिला अत्याचार प्रकरणात २१ दिवसात निकाल लागावा तसेच महिला व बाल अत्याचारांच्या घटनांमधील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी हा कायदा असणार आहे. आज कॅबिनेटमध्ये शक्ती कायद्याचा मसुदा मंजुरीसाठी येण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात सरकार कायदा आणण्याच्या तयारीत आहे.


सोनारपाडा येथील भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. डोंबिवलीतील सोनारपाड्यात लागलेल्या आगीमुळे परिसरात आगीच्या धुराचे लोट पसरले आहेत. चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे.


मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरूवात झाली असून मुकुल रोहतगी युक्तिवाद करत आहेत. तर ते राज्य सरकारची बाजू मांडणार आहेत. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे ही सुनावणी पार पडणार आहे.


येत्या १८ डिसेंबरपासून सर्वोच्च न्यायालय सुट्टीवर. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाचे नियमित कामकाज सुरू होणार


मराठा आरक्षणावर जानेवारीत पुन्हा सुनावणी होणार असून मराठा आरक्षणावरची स्थगिती हटवण्यास तूर्तात नकार मिळाला आहे.


दिवंगत अभिनेता चिरंजीवी सरजा यांची पत्नी मेघना राज आणि त्यांचा मुलगा या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दोघांच्याही कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचसोबत मेघनाच्या आई-वडीलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मेघना राज यांनी स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली.


मनरेगा आणि राज्य योजनेच्या एकत्रिकारणातून ‘शरद पवार ग्रामसमृद्धी योजना’ सुरू होणार आहे. शरद पवारांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य सरकाराची मोठी घोषणा करण्यात येणार आहे. शरद पवारांच्या ग्रामविकासातील योगदानाची अनोखी दखल. आज मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे.


अकाली दलाचे नेते प्रेमसिंह चंदुमांजरा शरद पवारांच्या भेटीला

अकाली दलाचे नेते प्रेमसिंह चंदुमांजरा यांच्यासह अकाली दलातील नेते नवी दिल्लीतील सहा जनपथवर दाखल झाले आहेत. यावेळी ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.


देशात अद्याप कोरोनाचा कहर सुरू असून गेल्या २४ तासात ३२,०८० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता बाधितांचा एकूण आकडा ९७ लाख ३५ हजारांवर पोहोचला आहे. तर दिवसभरात ४०२ जणांचा बळी गेला आहे. सध्या १ लाख ४१ हजार ३६० जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहे.


शेतकरी संघटना आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यातील चर्चा अयशस्वी

मंगळवारी दिल्लीत शेतकरी संघटना आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यात बैठक झाली. दरम्यान या बैठकीत अमित शहा यांनी कृषी कायदे रद्द करण्यास नकार दिल्याची माहिती समोर येतेय. कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव त्यांनी शेतकऱ्यांसमोर ठेवला असून कायदे मागे घेण्याच्या आपल्या भूमिकेवर शेतकरी मात्र ठाम आहेत.


जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे बुधवारी पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली. यामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे. अद्यापही दहशतवाद्यांना शोधण्याची मोहिम सुरु आहे.


मराठा आरक्षणाबाबत आज (९ डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठापुढे दुपारी दोन वाजता सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणावरची स्थगिती उठणार का? या प्रश्नाचे उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे. शिवाय, चार दिवसांपूर्वी पाच सदस्यीय घटनापीठासमोर होणार्‍या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाच वकिलांची समन्वय समितीही जाहीर केली होती. दरम्यान, राज्य सरकारच्यावतिने ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी आणि ज्येष्ठ वकील बलविंदर सिंह पटवारीया यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टीकवण्यात मोलाचा वाटा होता. आता सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टीकवण्यासाठी काय युक्तीवाद केला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (सविस्तर वाचा)


अहमदाबाद जिल्ह्यात केमिकल कंपनीला भीषण आग

अहमदाबादमधील सॉल्वेंट बनवणाऱ्या मातंगी केमिकल कंपनीला रात्री अचानक आग लागली. या कंनी सॉल्वेंट केमिकलचे ड्रम भरलले आहे, त्यामुळे अवघ्या काही क्षणात आगीने रौद्ररुपधारण केले. संपूर्ण केमिकल कंपनीही आगीच्या भस्मस्थानी सापडली आहे. केमिकलने भरलेल्या ड्रममुळे एकापाठोपाठ स्फोटांचे आवाज येत आहे. स्फोटांच्या आवाजांनी परिसर दणाणून गेला आहे.


First Published on: December 9, 2020 2:30 PM
Exit mobile version