योगा दिनानिमित्त देशात रेकॉर्ड ब्रेक लसीकरण, एका दिवसात ७० लाख नागरिकांना दिले लसीचे डोस

योगा दिनानिमित्त देशात रेकॉर्ड ब्रेक लसीकरण, एका दिवसात ७० लाख नागरिकांना दिले लसीचे डोस

योगा दिनानिमित्त देशात रेकॉर्ड ब्रेक लसीकरण, एका दिवसात ७० लाख नागरिकांना दिले लसीचे डोस

देशात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून सतत प्रयत्न केले जात आहेत. यात आज योग दिनानिमित्त देशात लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यात आला आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी देशात रेकॉर्ड ब्रेक लसीकरण झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आज ७० लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाविरोधी लस टोचण्यात आली आहे.

केंद्र सरकारने आजपासून देशातील प्रत्येक नागरिकास मोफत लस उपलब्ध करुन दिली जात आहे. यासंदर्भातील घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय योग दिनापासून देशात लसीकरणाची गती वाढवली गेली आहे. केंद्र सरकारने लस उत्पादनापैकी ७५ टक्के लसी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, तर २५ टक्के लसी खासगी रुग्णालयांकडून खरेदी केल्या जातील.

केंद्र सरकार या लस खरेदी करुन राज्य सरकारला पुरवणार आहे. तसेच यापूर्वी राज्यांनाही लसी खरेदी करण्यास सांगितले आहे. यात आज सकाळपासूनच देशात लसीकरण मोहीमेला जोरात सुरु झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत देशात सुमारे ७० लाखहून अधिक नागरिकांना लसीचे डोस दिले आहेत.

कोरोना विषाणच्या साथीला देशात येऊन एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. यात आतापर्यंत साडेतीन लाखांहून अधिक रुग्ण मरण पावले आहेत. त्यानंतर यावर्षी जानेवारी महिन्यात देशात लसीकरण मोहीम सुरू झाली. सुरुवातीच्या काळात, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर वयोवृद्धांसाठी लसीकरण मोहिम राबवण्याल आली. यानंतर ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांबरोबर आता कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना लसी देण्याची घोषणा करण्यात आली. तथापि, आतापर्यंत राज्य सरकारकडून १८ ते ४४ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येत होती. परंतु आजपासून केंद्राने ही लसीकरण मोहिम राबवण्यास सुरुवात केली आहे.


आयुर्वेदिक फॉर्मुल्याने बरा होईल कोरोनानंतरचा हाइपरग्लाइसीमिया आजार


 

First Published on: June 21, 2021 8:25 PM
Exit mobile version