Corona: अमेरिकेत बळींनी ओलांडली १ लाखांची संख्या; जगभरात बाधितांचा आकडा ५६ लाख पार!

Corona: अमेरिकेत बळींनी ओलांडली १ लाखांची संख्या; जगभरात बाधितांचा आकडा ५६ लाख पार!

Complaints about Ajmer Saundane Kovid Center

जगभरात कोरोनाचे थैमान दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरात कोरोनाचे ५६ लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. तरआतापर्यंत मृत्यूंची संख्या ३ लाख ५२ हजार २३३ वर पोहोचली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण ५६ लाख ८६ हजार ३०४ लोकांना झाली असून दिलासादायक बाब म्हणजे जगभरात २४ लाख ३० हजार ८०८ रुग्ण बरे झाले आहेत.

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना व्हायरसच्या केसेस तर एक तृतीयांश मृत्यू फक्त अमेरिकेत झाले आहेत.

अमेरिकेनंतर ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर

ncov2019.live ने दिलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत १७ लाख १६ हजार १५५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून तर १ लाख १७५ लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत ३७ हजार ४८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तेथे कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ६५ हजार २२७ इतकी आहे. अमेरिकेनंतर ब्राझील कोरोनाबाधितांच्या आकड्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

 वाढत्या संसर्गामध्ये रशिया देखील मागे नाही

कोरोना संसर्गाच्या बाबतीत अमेरिकेचा कट्टर विरोधक रशिया फारसा मागे राहिला नाही. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांची एकूण संख्या ३ लाख ६३ हजार ३४२ वर गेली आहे, तर मृतांची संख्या ३ हजार ८०७ इतकी आहे. पश्चिमेच्या बर्‍याच देशांनी रशियामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या आकडेवारीबद्दल शंका व्यक्त केली आहे, परंतु रशियन अधिकाऱ्यांकडून ते प्रत्येक वेळी नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आहे.

१२ देशांत प्रत्येकी १ लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त

अमेरिका, जर्मनी,स्पेन, फ्रांस, टर्की, इराण, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत आणि पेरु हे १२ देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना ग्रस्तांचा आकडा हा १ लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन, ब्राझील या सहा देशांमध्ये २५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळे झाला आहे. फक्त अमेरिकेत हा आकडा १ लाखांच्या वर पोहोचला आहे.


Corona: देशात बाधितांचा आकडा दीड लाखांवर; आतापर्यंत ४ हजारांहून अधिकांचा बळी!
First Published on: May 27, 2020 11:13 AM
Exit mobile version