घरदेश-विदेशCorona: देशात बाधितांचा आकडा दीड लाखांवर; आतापर्यंत ४ हजारांहून अधिकांचा बळी!

Corona: देशात बाधितांचा आकडा दीड लाखांवर; आतापर्यंत ४ हजारांहून अधिकांचा बळी!

Subscribe

बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत देशात एकूण १ लाख ५१ हजार ७६७ कोरोना रुग्ण आढळले आहेत तर मृतांचा आकडा ४ हजार ३३७ वर...

देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाची लागण झालेल्या लोकांची आकडेवारी आतापर्यंत दीड लाखांवर गेली असून कोरोनामुळे बळी गेल्यांची संख्या ४ हजार ३०० पार झाली आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत देशात एकूण १ लाख ५१ हजार ७६७ कोरोना रुग्ण आढळले आहेत तर मृतांचा आकडा ४ हजार ३३७ वर पोहोचला आहे.

- Advertisement -

गेल्या २४ तासांत देशात एकूण ६ हजार ३८७ कोरोनाचे नवे रूग्ण समोर आले आहेत तर, यादरम्यान १७० लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. त्याच बरोबर, आतापर्यंत १ लाख ५१ हजार ७६७ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून यापैकी ८३ हजार ४ अॅक्टिव्ह केसेस असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तर कोरोना आजाराने आतापर्यंत ६४ हजार ४२६ रुग्ण बरे झाले असून त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाने सर्वाधिक बळी

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाची ५४ हजार ७५८ कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात एकूण मृतांची संख्या १ हजार ७९२ असून त्यापैकी १६ हजार ९५४ रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. कोरोनाने कहर केलेल्या राज्यांपैकी तामिळनाडू हे महाराष्ट्रानंतर दुसर्‍या क्रमांकाचे राज्य आहे. आतापर्यंत येथे कोरोनाची १७ हजार ७२८ कोरोना रूग्णांची नोंद केली गेली आहे. तर कोरोनामुळे १२७ लोकांचा मृत्यू झाला असून ९ हजार ३४२ रुग्ण बरे झाले आहेत.


हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनमुळे धोका नाही; WHO च्या बंदीनंतर ICMR दिलं स्पष्टीकरण
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -