देश आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर – सुब्रह्मण्यम

देश आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर – सुब्रह्मण्यम

फोटो सौजन्य - The Hindu

देश आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर उभा असल्याची भीती देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी व्यक्त केली आहे. देशातील आर्थिक हालचाली पाहता पुढील काळात देशात आर्थिक मंदी येण्याची चिन्ह असल्याची भीती सुब्रह्मण्यम यांनी व्यक्त केली आहे. नोटाबंदी आणि जीएसटीनंतर देशात आर्थिक मंदी आली होती. पण, ही मंदी आता ओसरली आहे. मात्र आता देशात पुन्हा आर्थिक मंदी येऊ शकते अशी भीती  देशाचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी व्यक्त केली आहे. मागील दोन वर्षे कृषी क्षेत्रातील तूट अद्याप देखील भरून  निघालेली नाही. शिवाय, जीएसटीचं लक्ष्य देखील पूर्ण करण्यात अपयश आलं आहे. दरम्यान, आर्थिक क्षेत्रातील अनेक कंपन्या तोट्यात आहेत. या बाबी देशाच्या आर्थिक वाढीसाठी पोषक नाहीत. त्यामुळे देशात आर्थिक मंदी येऊ शकते अशी भीती अरविंद सुब्रह्मण्यम यांनी व्यक्त केली आहे. .

यावेळी त्यांनी आरबीआयची स्वायतत्ता कमी करा असं मत देखील व्यक्त केलं. यावेळी त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या एकाधिकारशाहीचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत असल्याचं म्हटलं आहे. सरकार आणि आरबीआयमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या वादाबद्दल अरविंद सुब्रह्मण्यम यांना विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी आपलं मत मांडलं आहे.

वाचा – डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन देशाचे आर्थिक सल्लागार

First Published on: December 10, 2018 2:38 PM
Exit mobile version