कबूल है….लॉकडाऊनमुळे राज्याच्या सीमेवरच पार पडला निकाह!

कबूल है….लॉकडाऊनमुळे राज्याच्या सीमेवरच पार पडला निकाह!

Marriage

देशात कोरोनावर विजय मिळवण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे लग्नासारखे समारंभावर लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे. कोणी आपलं लग्न पुढे ढकललं आहे तर कोणी कमी माणसात सोशल डिस्टन्सिंग पाळून लग्न उरकून घेत आहेत. मात्र या ल़ॉकडाऊनमध्ये कोणाला वेगळ्या राज्यात जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे उत्तराखंडमध्ये नवरा- नवरीला राज्याच्या सीमेवरच लग्न करण्याची वेळ आली आहे. जेव्हा वधू-वरांना एकमेकांच्या राज्यात येण्याची परवानगी मिळाली नाही त्यामुळे त्यांनी सीमेवर लग्न लावलं.

उत्तराखंडच्या टिहरी येथील कोठी कॉलनीतील मोहम्मद फैसलचे बुधवारी उत्तर प्रदेशमधील बिजनोरच्या नगीना येथील आयशा हिच्याशी लग्न होणार होते. आयशाच्या कुटुंबीयांनी सांगितले की बुधवारी मुलाकडचे येणार होते, परंतु लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना बाजूला उत्तर प्रदेशात येण्याची परवानगी मिळू शकली नाही. ठरलेल्या तारखेला आम्हाला निकाह करायचं होता.  त्यामुळे प्रशासनाच्या परवानगीने दोन्ही राज्यांच्या सीमेवर निकाह करण्यात आला. यावेळी दोन्ही राज्यांचे पोलिसही उपस्थित होते.

दिवसेंदिवस वाढतोय कोरोनाबाधितांचा आकडा

देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आता कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १२ हजार ३५९ वर गेली आहे. तर ६३ हजार ६२४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे ३ हजार ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यता आली आहे.


हे ही वाचा – वडिलांना सायकलवर घेऊन जाणाऱ्या मुलीला मिळाली फेडरेशनकडून ‘ही’ ऑफर!


 

First Published on: May 22, 2020 9:37 AM
Exit mobile version