covishield vs covaxin :कोवॅक्सिनपेक्षा कोव्हिशील्ड अधिक प्रभावी; या संशोधनावर भारत बायोटेकने व्यक्त केला संताप

covishield vs covaxin :कोवॅक्सिनपेक्षा कोव्हिशील्ड अधिक प्रभावी; या संशोधनावर भारत बायोटेकने व्यक्त केला संताप

Covaxin Covishield

देशात कोरोनाविरोधी लसीकरण मोहिम सध्या अनेक राज्यांमध्ये सुरु आहे. यात नागरिकांना सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेक कंपनीची कोवॅक्सिन दिली जात आहे. परंतु नागरिक कोणती लस घ्यावी याबाबत अजूनही संभ्रमावस्थेत आहेत. अशातच देशात कोवॅक्सिन लसीपेक्षा सीरमची कोव्हिशील्ड लस अधिक प्रभावी असल्याचे संशोधनातून समोर आले परंतु भारत बायोटेक कंपनीने हे संशोधन फेटाळून लावत त्याविरोधात संपात व्यक्त केला आहे. तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्हिशील्ड लसीवर झालेल्या अभ्यास अनेक त्रुटी असल्याचेही भारत बायोटेकचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वी लसींवर झालेल्या अभ्यासात कोवॅक्सीनपेक्षा कोव्हिशील्ड लस अधिक प्रभावी दावा करण्यात आला होता. परंतु भारत बायोटेकने हा अभ्यास अवैज्ञानिक आणि पूर्वग्रह दुषित असल्याचे म्हटले आहे. यावर आता भारत बायोटेक कंपनीने जाहीर केले आहे की, जुलै महिन्यात कंपनी कोवॅक्सिनच्या फेज तीनमधील क्लिनिकल ट्रायलचा डेटा सार्वजनिक करेल.

तसेच भारत बायोटेकने जाहीर केलेल्या एका निवेदनात म्हटले की , भारतात लसींच्या परिणामकारकतेबाबत झालेल्या अभ्यासात अनेक त्रुटी आहेत. या अभ्यासात कोवॅक्सिनपेक्षा कोव्हिशील्ड अधिक प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. लस बनविणाऱ्या कंपनीने म्हटले की, अखिल भारतीय वैज्ञानिक संशोधनाच्या अभ्यासात, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत. त्यामुळे जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात आकडेवारी आणि वैज्ञानिकतेचा अभाव आहे. हा अभ्यास पूर्व गृहितकांवर आधारित आहे.

भारत बायोटेक कंपनीने स्पष्ट केले की, कोवॅक्सिन लसीच्या तिसरा टप्प्यातील चाचणीचा अंतिम डेटा जुलैमध्ये जाहीर केला जाईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यातील माहिती प्रथम सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO)कडे सादर केली जाईल. यानंतर तो डेटा पीयर रिव्यूड जर्नल्समध्ये प्रकाशित केला जाईल. त्यानंतर जुलैदरम्यान हा डेटा सार्वजनिक केले जाईल. जानेवारी महिन्यातच कोवॅक्सिन लसीला आत्पकालीन वापरासाठी परवानगी दिली होती, परंतु त्यावेळी या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरु होते.

द मिंटच्या अहवालानुसार कंपनी पुढे म्हणाली, कोवॅक्सिन लसीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्राय संपल्यानंतर अंतिम विश्लेषण डेटा उपलब्ध होईल त्यानंतर भारत बायोटेक कंपनी COVAXIN लसीच्या परवानगीसाठी अर्ज करेल.” भारत बायोटेक बिझिनेस हेड राचेस एला यांनी ट्वीट करत म्हटले की, खोट्या पीयर रीव्यूड कामाचा विचार कसा केला जाईल? यात पुन्हा एक ट्वीट करत एला म्हणाल्या, लसींच्या पुनरावलोकनावर केलेल्या अभ्यासानुसार मीडिया आणि संशोधक निष्कर्ष काढतायंत ह आश्चर्यकारक आहे.

अलीकडेच, अखिल भारतीय विज्ञान संशोधनात असा दावा केला गेला आहे की, कोवॅक्सिन लसीच्या तुलनेत कोव्हिशील्ड लसींमुळे शरीरात सर्वाधिक अँटीबॉडी तयार होत आहे. या अभ्यासात असे म्हटले आहे की, कोवॅक्सिन कोव्हिशील्डपेक्षा कमी प्रभावी आहे. तथापि, हा अभ्यास अद्याप प्रकाशित केलेला नाही. या अभ्यासामध्ये १३ राज्यांमधील २२ शहरांमधील ५१५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेता होता.


Surya Grahan 2021: यंदाचे पहिले सूर्यग्रहण आज ‘या’ वेळेत लागणार; जाणून घ्या यावेळेत काय करावे?


 

First Published on: June 10, 2021 2:09 PM
Exit mobile version