Corona: कोरोना हल्ल्यापूर्वी जात-पात, धर्म, वंश, भाषा बघणार नाही; मोदींनी व्यक्त केली चिंता

Corona: कोरोना हल्ल्यापूर्वी जात-पात, धर्म, वंश, भाषा बघणार नाही; मोदींनी व्यक्त केली चिंता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून आणखी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. तो म्हणजे कोविड-१९ हा हल्ला करण्यापूर्वी कोणताही जात-पात, धर्म, वंश, रंग, पंथ, भाषा किंवा सीमा बघणार नाही. त्यामुळे आपले आचरण आणि प्रतिसाद हे ऐक्य तसेच बंधुता यांना प्राधान्य देणारे हवे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून देशातील नागरिकांना सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लिंक्डइन’ वरून एक लेख प्रसिद्ध केला आहे. कोरोना संकटानंतर जगाला एका नव्या बिझनेस मॉडलची गरज आहे. तरुणांची ऊर्जा असणारा भारत या कोविड १९ संकटानंतर जगाला एक नवीन मॉडेल देईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेखात नमूद केले आहे.

हेही वाचा – Coronavirus : लॉकडाऊन २.० सवलतीबाबत केंद्र-राज्यांत मतभेद

देशातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी 

देशात आतापर्यंत १५ हजार ७१२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. तसेच आतापर्यंत देशात ५०७ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला असून २३ राज्यांमध्ये ४३ जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

First Published on: April 19, 2020 9:06 PM
Exit mobile version