JN.1 variant : Covid च्या नव्या व्हेरियंटमुळे खळबळ, गेल्या 24 तासांत देशांत कोरोनाच्या 800 पेक्षा अधिक रूग्णांची नोंद

JN.1 variant :  Covid च्या नव्या व्हेरियंटमुळे खळबळ, गेल्या 24 तासांत देशांत कोरोनाच्या 800 पेक्षा अधिक रूग्णांची नोंद

कोरोनाने डोकंवर काढलं आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 800 हून अधिक नवे रूग्ण आढळले आहे. 24 डिसेंबर ते 30 डिसेंबर या काळात देशातमध्ये 4652 कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. गेल्या आठवड्यात रूग्णांची संख्या 3818 होती. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 च्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 ची लागण झालेल्या रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना 847 रूग्णांची नोंद झाली आहे. तर सक्रिय रूग्णांची संख्या 4,309 वर पोहोचली आहे. देशातमध्ये JN.1 चे एकूण 178 रग्ण आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रूग्णांची नोदं केळरमध्ये झाली असून सध्या केरळमध्ये 83 JN.1 चे रूग्ण आहेत.

हेही वाचा… Corona Cases : पश्चिम बंगालमध्ये 9 महिन्यांनंतर कोरोना रुग्णाचा मृत्यू; JN.1 चा वाढतोय धोका

जानेवारी 2020 पासून आतापर्यंत देशात कोरोना रूग्णांची संख्या 4,50,12,484 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची एकून संख्या 5,33,361 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासात 3 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

चीन, USA, सिंगापूर आणि काही युरोपीयं देशामध्ये JN.1 च्या रूग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोना विषाणू आल्यापासून त्याची रूपे वेळेवेळी बदलत असताना आपल्याला दिसत आहे. सध्या दिल्लीमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन (Coronavirus Omicron variant) चा सब व्हेरियंट JN.1 चा पहिला रूग्ण आढळला. उपचारानंतर हा रूग्ण बरा देखील झाला. JN.1 चे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. असं तज्ज्ञांनी सांगितलं. JN.1 वेगाने पसरत आहे. मात्र या विषाणूचे लक्षणे सौम्य आहेत.

First Published on: January 1, 2024 3:13 PM
Exit mobile version