CoronaVirus: इटलीतील भारतीय विद्यार्थी एका महिन्यानंतर सुखरूप परतले घरी

CoronaVirus: इटलीतील भारतीय विद्यार्थी एका महिन्यानंतर सुखरूप परतले घरी

CoronaVirus: इटलीतील भारतीय विद्यार्थी एका महिन्यानंतर सुखरूप परतले घरी

इटलीत शिकत असलेले भारतीय विद्यार्थ्यांच्या एका गटाला दिल्लीत २६ दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवले होते. पण मंगळवारी २६ दिवसांच्या क्वारंटाईन नंतर त्यांना आंध्र प्रदेशातील त्यांच्या घरी सोडण्यात आले आहे. या कोरोनाच्या संकटात जगात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या भारतीयांना त्यांच्या देशात परत आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. परदेशातून परत आलेल्या सर्व भारतीयांना कोरोनाची लागण झाल्यास किंवा संशयित असल्यास १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येते.

आंध्र प्रदेशचे कोविड-१९ नोडलचे अधिकारी आर्जा श्रीकांत यांनी याबाबत एएनआयला बोलताना सांगितले की, आज सकाळी विजयवाडा येथे पोहोचलेल्या विद्यार्थ्यांची सरकारी रुग्णालयात चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना घरी सोडले. ते आता कायम घरी क्वारंटाईन राहतील.

या विद्यार्थ्यांची बस १० एप्रिलला दिल्लीहून निघाली होती. मात्र १२ एप्रिलला छत्तीसगडमध्ये थांबवण्यात आली. त्यामुळे आंध्र प्रदेश सरकार आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने यामध्ये हस्तक्षेप केला आणि राज्याचे डीजीपी कृष्णबाबू यांनी छत्तीसगड अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मग त्यानंतर रविवारी संध्याकाळी विद्यार्थ्यांची बस पुन्हा सुरू झाली. सोमवारी संध्याकाळी विशाखापट्टणम आणि मंगळवारी पहाटे विजयवाडा येथे पोहोचली.

या बसमधला एक विद्यार्थी छत्तीसगड येथे उतरला. तर चार विद्यार्थी उत्तर आंध्र जिल्ह्यात उतरले आणि बाकी उर्वरित २८ विद्यार्थी विजयवाडाला पोहोचले. १२ एप्रिलला राज्याच्या कोविड-१९ कमांड कंट्रोल सेंटरने छत्तीसगडमधील विद्यार्थ्याच्या प्रवासाची माहिती दिली. इटलीत शिकण्यासाठी गेलेले हे भारतीय विद्यार्थी दिल्लीत १ मार्चला दाखल झाले होते. त्यांना आयटीबीपीच्या कॅम्पमध्ये क्वारंटाईन ठेवण्यात आले होते. दोन आठवड्यानंतरही १२ दिवसांचा त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी वाढवला होता.


हेही वाचा – LockDown: घराकडे पायी निघालेल्या ४० मजुरांची तेलंगणा पोलिसांनी घेतली जबाबदारी


 

First Published on: April 15, 2020 4:34 PM
Exit mobile version