Coronavirus: कोरोनाबाधित रुग्ण ११ दिवसांनंतर विषाणूचा संसर्ग पसरवू शकत नाही – वैज्ञानिकांचा दावा

Coronavirus: कोरोनाबाधित रुग्ण ११ दिवसांनंतर विषाणूचा संसर्ग पसरवू शकत नाही – वैज्ञानिकांचा दावा

Corona Update: मुंबईत आज १,३७२ नव्या रुग्णांची नोंद, एकूण आकडा ८१ हजार पार!

जगभरातील कोरोना विषाणू फैलाव झपाट्याने वाढत आहे. यादरम्यान केलेल्या संशोधनानुसार अनेक कोरोना संदर्भात गोष्टी समोर येत आहेत. दरम्यान या जीवघेण्या विषाणूचा शिकार झालेला रुग्ण ११ दिवसांनंतर दुसऱ्या व्यक्तीला संक्रमित करू शकत नाही असा दावा कोरोनावर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी केला आहे. ते म्हणाले की, कोरोनाची लक्षणे त्या व्यक्तीमध्ये दिसण्या अगोदर दोन दिवस आधी हा जीवघेणा विषाणू पसरवू शकतो.

सिंगापूरमधील संशोधकांनी सांगितले की, कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण सात ते १० दिवसांपर्यंत संसर्ग पसरवू शकतो. या कारणामुळे त्या रुग्णाला ११ व्या दिवसांपासून आयसोलेशेनमध्ये ठेवण्याची गरज नाही.

सिंगापूरमधील नॅशनल सेंटर फॉर इन्फेक्टीव्ह डिजीज अँड अ‍ॅकॅडमी ऑफ मेडिसिनमधील वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूच्या ७३ रुग्णांची तपासणी केली. यामध्ये रुग्ण दोन आठवड्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह असूनही इतरांना संसर्ग होऊ शकला नाही, असे स्पष्ट झाले आहे.

संशोधकांनी म्हटले की, कोरोना विषाणूची लागण सुरू झाल्यानंतर एकत्रित केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना विषाणू लागण झालेल्या व्यक्तीमध्ये लक्षणे दिसण्यापूर्वी दोन दिवसा आधी संसर्गाचा कालावधी सुरू होतो आणि सात ते १० दिवस तो टिकतो. लक्षणे दिसल्यानंतर पहिल्या आठवड्यात ते अधिक लोकांना संक्रमित करू शकतात.

आतापर्यंत जगभरातील ५५ लाख २ हजार ७४५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तीन लाख ३४ हजार ७६२ जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत आढळले आहे. कोरोनाबाधितांच्या यादीत अमेरिकेच्या पाठोपाठ ब्राझील देश दुसऱ्या क्रमांकावर तर रशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे.


हेही वाचा – Coronavirus: भारतातील ‘या’ सात राज्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल करू नका – WHO


 

First Published on: May 25, 2020 12:20 PM
Exit mobile version