Live Update: रिपब्लिक टीव्हीच्या सीईओला दोन दिवसांची पोलीस कोठडी

Live Update: रिपब्लिक टीव्हीच्या सीईओला दोन दिवसांची पोलीस कोठडी
टिआरपी प्रकरणात अटक केलेल्या रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विका खानचंदानीला १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी झाल्याचे समोर आले आहे.
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे.
भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या पुन्हा एकदा एका वादग्रस्त विधानावरून वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. एका कार्यक्रमात बोलताना प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी वर्ण व्यवस्थेवरून प्रश्न उपस्थित केला. ‘ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटलं, तर वाईट वाटत नाही. पण, शुद्राला शुद्र म्हटलं, तर वाईट वाटतं. कारण काय आहे, तर समजत नाही,’ असा प्रश्न प्रज्ञा ठाकूर यांनी केला. मात्र, त्यांच्या या विधानावरून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २०११ रोजी आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. येत्या १५ डिसेंबरपासून परीक्षेचे अर्ज भरता येणार आहे. बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत सरल डेटाबेसवरुन भरता येणार आहे.

रिपब्लिक टीव्हीचे सीईओ खानचंदानी यांना अटक; मुंबई पोलिसांची कारवाई


केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून पंजाब आणि हरयाणाच्या शेतकऱ्यांचे दिल्ली सीमेवर आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. दरम्यान, या आंदोलनाचे लोण आता परदेशांमध्येही पसरलेले पाहायला मिळत आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी शीख समुदायातील अनेकांनी निदर्शने केली. यावेळी महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे.
आर्थिक मुद्द्यांवरुन देशव्यापी निदर्शने घडवून आणणाऱ्या एका इराणच्या पत्रकारास फाशी देण्यात आली आहे. रुहोल्ला झॉम, असे आरोपीचे नाव असून शनिवारी सकाळी या पत्रकारास फाशी देण्यात आली. या पत्रकाराने ऑनलाइन मोहिमांच्या माध्यमातून २०१७ मध्ये निदर्शने घडवून देशातील सरकार उलथवण्याचे प्रयत्न केला होता. या आरोपाखाली झॉम आरोपीला फाशी देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. दरम्यान, शेतकर्‍यांच्या सुरु असलेल्या आंदोलनामुळे गेल्या १८ दिवसांपासून बंद असलेली दिल्ली-नोएडा चिल्ला सीमा आता उघडण्यात आली आहे. चिल्ला सीमेवर धरणे आंदोलनाबाबत शेतकऱ्यांनी शनिवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेतली. यावेळी मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चातून सहमती झाली. यानंतर वाहतुकीसाठी मार्ग खुला करण्यात आला आहे.
First Published on: December 13, 2020 6:04 PM
Exit mobile version