Live Updates: दिलासादायक: कोरोना रूग्णसंख्येत घट

Live Updates: दिलासादायक: कोरोना रूग्णसंख्येत घट
राज्यात कोरोना रूग्णसंख्येत घट झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. आज राज्यात २ हजार ९४९ नव्या रूग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात ६० कोरोनाबधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज ४ हजार ६१९ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १७ लाख ६१ हजार ६१५ कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत राज्यात १८ लाख ८३ हजार ३६५ कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत ४८ हजार २६९ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
यूट्यूब, जीमेल, गुगलची सेवा पूर्वपदावर आली आहे. काही तांत्रिक कारमांमुळे यूट्यूब, जीमेल, गुगलची सेवा ठप्प झाली होती.
जगभरात काही तांत्रिक काळांमुळे काही तासांपासून यूट्यूब,गुगल ठप्प

कॉमेडियन भारती सिंग NCB कार्यालयात दाखल झाली आहे. ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी भारती सिंगला झाली होती अटक.

हिवाळी अधिवेशनात विधासभेत सरकारने मांडलेल्या ६ अध्यादेश, १० विधेयकांना मंजुरी

महिला व बालकांसाठीचे शक्ती विधेयक २०२० विधानसभेत मंजूर

दोन दिवसाचे अधिवेशन लोकशाहीला परवडणार नाही  – नाना पटोले
दोन दिवसाचे अधिवेशन लोकशाहीला परवडणार नाही अशा शब्दातच विधानसभा अध्याक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारचे आज कान टोचले. इतर राज्यातही ८ दिवसांचे अधिवेशन होत आहे. अशावेळी अवघ्या दोन दिवसातल्या अधिवेशनाने जनतेच्या प्रश्नाला न्याय मिळणार नाही, अशा शब्दात नाना पटोले यांनी अधिवेशनाच्या कालावधीवर टिप्पणी केली. विधानसभेच्या कामकाजाला पहिल्या दिवसाची सुरूवात झाल्यानंतर रवि राणा यांच्या फलकबाजीनंतर त्यांनी हे मत सभागृहात बोलताना मांडले. (सविस्तर वाचा)

आजपासून विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. यावेळी मराठा आरक्षणावरून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं. गेल्या अधिवेशनात सत्तारूढ पक्षाकडूनच गोंधळ करण्यात येत आहे. तसेच शेतकरी, विविध समाजाचे मुद्दे टाळण्याचा देखील प्रयत्न करण्यात येत असून अधिवेशनातून पळ काढण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन
देशात कोरोनाबाधितांचा आकडा ९८ लाख ८४ हजार १०० वर पोहोचला असून गेल्या २४ तासात २६ हजारांहून अधिक नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ३३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आजपासून विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. परंपरेनुसार नागपूरला होणारे हे अधिवेशन यंदा कोरोनामुळं दोन दिवसांचे आणि मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन दिवसात विरोधी पक्ष सरकारला कोरोना, मराठा आरक्षण, शेतकरी मदतीवरुन घेरण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सरकार या दोन दिवसात महत्वाची विधेयकं मंजूर करुन घेण्याच्या तयारीत आहे.
विधिमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ६ अध्यादेश, १० विधेयके मांडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०० निर्णय घेण्यात आले असून त्यातील ८ महिने कोरोनाशी झुंज देण्यात गेली आहेत. कोरोना आणि बेमोसमी पाऊस या संकटांशी सामना करीत सरकार मार्गक्रमण करीत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितले होते.
राज्य सरकारच्या हिवाळी आधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास २५०० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यापैकी १७ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात तर दक्षिण मुंबईसह उपनगरामंध्ये देखील पावसाची हजेरी.
राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांमध्ये रविवारी थोडी घट बघायला मिळाली. गेली काही दिवस राज्यात ५ हजरांच्या आसपास रुग्ण बरे होत होते. दिवसभरात ३ हजार ८३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण ९३.४४ टक्के एवढं असून एकूण संख्या ही १७ लाख ५७ हजार एवढी झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये ३ हजार ७१७ नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही १८ लाख ८० हजार ४१६ एवढी झाली आहे. दिवसभरात ७० रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू दर हा २.५६ वर पोहोचला आहे.
First Published on: December 14, 2020 3:18 PM
Exit mobile version