Live Update: राज्यात उद्यापासून रात्री संचार बंदी लागू

Live Update: राज्यात उद्यापासून रात्री संचार बंदी लागू
राज्यात उद्यापासून रात्री संचार बंदी लागू करण्यात आली आहे. पुढील १५ दिवस अधिक सतर्कता पाळण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सविस्तर वाचा  
  सोन्या-चांदीचे दर वधारले आहे. सोने प्रतितोळा ५० हजार ८०० रुपये झाले आहे.
काँग्रेसचे जेष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचं निधन झाल्याचं समोर आलं आहे. दीर्घ आजाराने वयाच्या ९३ व्या वर्षी व्होरा यांनी अखेरचा श्वास घेतला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत आणि सोनिया गांधींना पत्र देणार आहेत.
सायन कोळीवाडा येथील महाड कॉलनीतील आंबेडकर नगरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचे समोर येत आहे.
राष्ट्रवादी नेत्यांची आज मुंबईत बैठक असणार आहे. या बैठकीत राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित असणार आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने पुन्हा समन्स बजावला आहे. प्रताप सरनाईक यांना दुपारी १ वाजेपर्यंत ईडी कार्यालयात दाखल होण्यास सांगितले आहे. यापूर्वी १० डिसेंबरला सरनाईक यांची चौकशी झाली होती.
बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा अभिनेता अर्जुन रामपाल याची एनसीबी चौकशी करत आहे. आज याच प्रकरणी अर्जुन रामपाल चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाला आहे.
देशात गेल्या २४ तासांत २४ हजार ३३७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २५ हजार ७०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाबाधित रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्त होण्याची संख्या अधिक आहे. देशात आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ कोटी ५५ हजार ५६० झाली आहे. यापैकी आतापर्यंत ९६ लाख ६ हजार १११ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून १ लाख ४५ हजार ८१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या ३ लाख ३ हजार ६३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
देशात २० डिसेंबरपर्यंत १६ कोटी २० लाख ९८ हजार ३२९ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी ९ लाख १३४ नमुन्यांच्या चाचणी या काल दिवसभरात झाल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.
जगातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, ७ कोटी ७१ लाख ६९ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत १६ लाख ९९ हजारांहून अधिक रुग्ण मृत्युमुखी पडले असून ५ कोटी ४० लाख ८८ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  
First Published on: December 21, 2020 3:49 PM
Exit mobile version