covid 19 Vaccine For Children: देशात ६ ते १२ वयोगटातील मुलांवर होणार लसीची चाचणी

covid 19 Vaccine For Children:  देशात ६ ते १२ वयोगटातील मुलांवर होणार लसीची चाचणी

भारतात लहान मुलांसाठी कोरोना लस सप्टेंबरमध्ये येण्याची शक्यता - NIV संचालक

देशात लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी सुरु करण्यात आली आहे. दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात १२ ते १८ वयोगटातील बऱ्याच मुलांना कोव्हॅक्सिन (Covaxin) लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्यानंतर आता सोमवारी ६ ते १२ वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी करण्यात येणार आहे ( covid 19 Vaccine For Children: vaccine will be tested on children between ages of 6 and 12 in India ) त्यानंतर २ ते ६ वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी करण्यात येणार आहे. AIIMSरुग्णालयात १२ ते १८ वयोगटातील मुलांवर बुधवारी लसीची चाचणी सुरु केल्यानंतर त्यांना पहिला डोस देऊन घरी पाठवण्यात आले. या मुलांची दोन दिवसांनंतर अँटिबॉडीज टेस्ट करुन त्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार असल्याचे एम्सच्या तज्ज्ञांनी सांगितले आहे.

मुलांवर कोरोना लसीची चाचणी करण्याआधी त्यांच्या पालकांकडून मुलांच्या आरोग्याची माहिती घेण्यात आली. त्याचप्रमाणे मुलांच्या आरोग्याची योग्य तपासणी करण्यात आली. टेस्ट रिपोर्ट पूर्णपणे निरोगी आल्यानंतरच मुलांना लसीचा डोस देण्यात आला आहे. देशातील बऱ्याच रुग्णालयांमध्ये २ ते १८ वयोगटातील ५२५ मुलांवर कोव्हॅक्सिन लसीची चाचणी केली जाणार आहे. AIIMS रुग्णालयात १२ ते १८ वयोगटातील ३० मुलांची चाचणी करण्यात आली. ज्यात बऱ्याच मुलांना लस दिल्यानंतर दुसऱ्या वर्गातील मुलांची चाचणी केली जाईल. चाचणी रिपोर्ट आल्यानंतर ६ ते १२ वयोगटातील मुलांना लसीचा डोस देण्यात येईल.


हेही वाचा – Coronavirus : कोरोनाबाधितांना आता वॅक्सिनची गरज नाही, आरोग्य तज्ज्ञांचा दावा

 

First Published on: June 13, 2021 9:55 AM
Exit mobile version