Corona cases in India : देशात कोरोनाचा उद्रेक सुरुच; बऱ्या होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या तिप्पट

Corona cases in India  : देशात कोरोनाचा उद्रेक सुरुच; बऱ्या होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या तिप्पट

देशातील कोरोना रुग्णसंख्येत आज पुन्हा मोठी वाढ पाहायला मिळतेय. यातच आज देशातील नव्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दोन लाखांच्या जवळपास पोहचला आहे. गेल्या 24 तासात देशात 1,94,720 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 442 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मंगळवारच्या तुलनेत आज रुग्णसंख्या वाढण्याबरोबरचं मृतांचा आकडाही वाढला आहे. मंगळवारच्या तुलनेत ही रुग्णवाढ 15.9 टक्के जास्त आहे. यामुळे देशातील कोरोनाचा संसर्ग दर 11.05 टक्क्यांवर पोहचलाय. तर देशातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 4868 वर पोहचली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये आहे.


कोरोना महामारीमुळे आत्तापर्यंत देशातील एकूण 4,84,655 रुग्णांना प्राण गमावावे लागले. मात्र दुसरीकडे लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. देशात आत्तापर्यंत 153 कोटींहून अधिक लसीकरण पूर्ण झाले आहे. गेल्या 24 तासात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालेल्या टॉप 5 राज्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे 34,424 नवीन रुग्ण आढळले आहेत, त्यानंतर दिल्लीत 21,259, पश्चिम बंगालमध्ये 21,098, तामिळनाडूमध्ये 15,379 आणि कर्नाटकमध्ये 14,473 नवे रुग्ण आढळले आहेत. 54.77 टक्के नवीन रुग्ण या पाच राज्यांमधून आले आहेत. एकूण नवीन रुग्णांपैकी 17.68 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत.

भारताचा कोरोना मधून बरे होण्याचा दर आता ९६.०६ टक्के आहे. गेल्या 24 तासांत एकूण 60,405 रुग्ण बरे झाले असून, देशभरातील एकूण बरे झालेल्यांची संख्या 3,46,30,536 झाली आहे. आता देशात कोरोनाचे एकूण 9,55,319 सक्रिय रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासात 1,33,873 सक्रिय प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.

देशातील कोरोना रुग्णांची सद्यस्थिती

एकूण प्रकरणे: 3,60,70,510
सक्रिय प्रकरणे: 9,55,319
एकूण रिकव्हर रुग्ण: 3,46,30,536
एकूण मृत्यू: 4,84,655
एकूण लसीकरण: 1,53,80,08,200
Omicron चे रुग्ण : 4,868


गंगासागर मेळा कुंभमेळ्यासारखा ठरणार ‘कोरोना सुपर स्प्रेडर’; आरोग्य तज्ज्ञांचा इशारा

First Published on: January 12, 2022 10:21 AM
Exit mobile version