Covid peak in India : भारतातून कोरोनाची तिसरी लाट कधी संपणार? अमेरिकन तज्ज्ञ म्हणतात…

Covid peak in India : भारतातून कोरोनाची तिसरी लाट कधी संपणार? अमेरिकन तज्ज्ञ म्हणतात…

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जगभरात कोरोनाचे सावट थैमान घालत आहे. त्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आता कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, मागील 24 तासांत कोरोनाचे जवळपास 2 लाख रुग्ण आढळले आहेत. मात्र हा कोरोना केव्हा संपुष्टात येणार याची सर्वांनाच चिंता लागली आहे. देशभरात कोरोना हाहाकार माजवत असताना ही कोरोनाची तिसरी लाट केव्हा संपणार यावर अमेरिकन तज्ज्ञांनी माहीती दिली आहे. एका मुलाखती दरम्यान, अमेरिकेच्या मिशिगन यूनिव्हर्सिटीच्या डेटा शास्त्रज्ञ भ्रमर मुखर्जी यांनी सांगितले की, हा कोरोना व्हायरस कधीपर्यंत अशाच प्रकारचा हाहाकार माजवणार आहे.

जानेवारीच्या शेवटी कोरोना हाहाकार

आपण जी कोरोना परिस्थिती देशात पाहत आहोत ती लोकांचा दृष्टीकोन बदलणारी आहे. दिल्ली,महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत गेली. त्यामुळे हे पाहणे गरजेचे आहे की, पुढील 7 कींवा 8 दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या कमी होते की नाही.दरम्यान, दिल्लीमधील पॉझिटीविटी रेट कमी झाला आहे. पुढील काही दिवसांत काही राज्यात कोरोना कहर वाढणार आहे. याशिवाय भारतात जानेवारीच्या शेवटी कोरोना हाहाकार माजवणार आहे.जंगलात लागलेल्या वणव्याप्रमाणे कोरोनाचा नवा व्हेरिएंट मोठ्या प्रमाणात पसरत आहे.

यावर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर लसीकरण हा शेवटचा उपाय आहे. तरीही परिस्थिती दुसऱ्या लाटेपेक्षा खूप वेगळी आहे. वास्तविक, भारतात लसीकरणामुळे लोकांची प्रतिकारशक्ती बदलली आहे.जर, आपण इतर देशांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांची संख्या मोठी आहे, ज्यामध्ये लसीकरण न केलेल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मला खात्री आहे की, फेब्रुवारीपर्यंत लाट संपेल. गंगासागर मेळ्यासारख्या कार्यक्रमानंतर काय होईल माहीत नाही. मात्र, जानेवारी अखेरीस कोरोना उच्चांक गाठेल आणि फेब्रुवारी अखेर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता, अमेरिकन तज्ज्ञांनी वर्तवली आहे.


हेही वाचा – corona Virus : महाराष्ट्रात कोरोनामुळे २६५ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू, २ हजार १४५ जणांवर उपचार सुरु


 

First Published on: January 13, 2022 9:21 AM
Exit mobile version