Covid19: ३०० हून अधिक कोरोना मृतदेहांवर अंतिमस्कार करणाऱ्या कोरोना योद्ध्याची झुंज अपयशी

Covid19: ३०० हून अधिक कोरोना मृतदेहांवर अंतिमस्कार करणाऱ्या कोरोना योद्ध्याची झुंज अपयशी

Covid19: ३०० हून अधिक कोरोना मृतदेहांवर अंतिमस्कार करणाऱ्या कोरोना योद्ध्याची झुंज अपयशी

देशभरात थैमान घालत असलेल्या कोरोनामुळे (covid19) आजवर अनेकांचा मृत्यू झाला. स्मशानभूमीत अंतिसंस्कारासाठी मृतदेहांची रांग लागण्याचे दुर्देवी चित्र या काळात पहायला मिळाले. याच काळात ३०० हून अधिक कोरोना मृतदेहांवर सन्मानाने अंतिम संस्कार करण्याचे काम करणाऱ्या प्रवीण कुमार या कोरोना योद्धाचा कोरोनामुळेच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवीण कुमार हे हरियाणा हिसार महानगर पालिकीचे अधिकारी होते. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात त्यांना प्राण सोडला. हजारो लोकांना मोक्ष मिळवून देणाऱ्या त्यांना मदत करणाऱ्या प्रवीण यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर एका बेडसाठी पळापळ करावी लागली. प्रशासन देखिल त्यांची कोणतीही मदत करु शकले नाही. शेवटी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रवीण कुमार हे हिसार महापालिकेच्या विभागातील कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे अंतिम संस्कार करण्यासाठी पालिकेने स्थापन केलेल्या संघाचे प्रमुख होते. ४३ वर्षांच्या प्रवीण कुमार यांनी गेल्या वर्षभरापासून ३०० हून अधिक कोरोना मृतदेहांवर अंतिमसंस्कार केले. दोन दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना बेड न मिळाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रवीण यांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

प्रवीण यांच्या मृत्यू पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत. कोरोनाच्या गाईडलाईन्सनुसार, मंगळवारी ऋषी नगर स्मशानभूमी घाटात त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. प्रवीण कुमार याआधी पालिका सफाई कामगार युनियनचे अध्यक्ष होते. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हरियामद्ये गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या २४ तासात हरियाणामध्ये ६हजार ८१८ नवे रुग्ण आढळून आले आहे.


हेही वाचा – तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव, दिल्लीत मे महिन्यात ७० वर्षानंतर सर्वाधिक कमी तापमानाची नोंद

First Published on: May 20, 2021 2:57 PM
Exit mobile version