घरदेश-विदेशतौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव, दिल्लीत मे महिन्यात ७० वर्षानंतर सर्वाधिक कमी तापमानाची नोंद

तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव, दिल्लीत मे महिन्यात ७० वर्षानंतर सर्वाधिक कमी तापमानाची नोंद

Subscribe

तौक्ते चक्रीवादळाने देशातील अनेक राज्यांमध्ये हाहाकार माजवला. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, केरळ, कर्नाटक राज्यांमध्ये तौक्ते चक्रीवादळाने मोठे आर्थिक आणि भौतिक नुकसान केले. परंतु या वादळाच्या प्रभावामुळे दिल्ली-एनसीआरच्या तापमान कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. चक्रीवादळामुळे सुरु असलेल्या पावसामुळे दिल्लीत मे महिन्यात ७० वर्षानंतर सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. बुधवारीपासून दिवसभर सुरु असलेल्या संततधार पावसामुळे दिल्लीचे तापमान २३.८ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले आहे. यापूर्वी १९५१ मध्ये दिल्लीत सर्वाधिक कमी तापमानाने रेकॉर्ड ब्रेक केले होते.

दिल्लीत बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ३१.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान येत्या २४ तासांतही दिल्लीत रिमझिम पाऊस सुरु राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दिल्लीत सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मे महिन्यात सर्वाधिक कमी तापमान नोंदवण्यात आला आहे. याविषयी भारतीय हवामान खात्याचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी सांगितले की, दिल्लीत सर्वाधिक कमी तापमानाचा विक्रम १९५१ साली मोडण्यात आला होता. त्यानंतर १३ मे १९८२ साली सर्वाधिक कमी म्हणजे २४.८ डिग्री सेल्सियस तापमान नोंदविले होते. तर दुसरीकडे स्कायमेट वेदरचे उपाध्य़क्ष महेश पलावत यांनी सांगितले की, मे महिन्यात दिल्लीत सर्वाधिक तापमान नोंदविले जाते. परंतु तौक्ते वादळाच्या परिणाम दिल्ली-एनसीआरमध्ये दिसून येत आहे.

- Advertisement -

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, दिल्लीतील आकाशात दाट ढग तयार झाले आहेत. मान्सूनपूर्व टप्पा चालू असताना असे ढग सामान्यत: केवळ पावसाळ्यातच दिसतात. त्यामुळे या काळात पाऊस होण्याची फारच कमी शक्यता आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये सतत पाऊस पडत असल्याचे मानले जात आहे.

प्रादेशिक हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बुधवारी दिल्लीत कमाल तापमान १६ डिग्रीहून कमी होत २३.८ डिग्री सेल्सियस झाले आहे. त्याचवेळी किमान तापमान ५ अंशांहून कमी होत २१,४ डिग्री सेल्सियस झाले आहे. हवेतील आर्द्रतेची कमाल पातळी १०० टक्के आणि किमान पातळी ७८ टक्के आहे. दिल्लीच्या वेगवेगळ्या भागांमधील माहिती तापमानविषयी बोलताना, पाममध्ये किमान तापमान २५.८ डिग्री सेल्सियस, लोधी रोडमध्ये २३.४, नरेलामध्ये २४.१ आणि गुरुग्राममध्ये २३.७ कमाल तापमान नोंदविले आहे.

- Advertisement -

पुढील २४ तासांत हवामान बदलणार नाही

येत्या २४ तासांत दिल्लीचे हवामान बदलणार नाही, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलका पाऊस सुरूच राहील. यामुळे दिल्लीत कमाल तपमान ३० आणि किमान २० डिग्री सेल्सियस राहील. येत्या २४ तासांत दिल्लीचे हवामान बदल होत तापमानात वाढ होईल. विशेष म्हणजे, सतत उष्णतेचा सामना करणाऱ्या दिल्लीत हवामान खात्याने एक दिवस अगोदर जोरदार वारे वाहून पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. यामुळे कमाल व किमान तापमानही कमी झाल्याचे सांगण्यात आले.


SSC Exam 2021: शालेय विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत राज्य सरकार गंभीर नाही- हायकोर्ट


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -