Live Update: वडाळ्यामध्ये पार्किंगमधील दोन बसला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Live Update: वडाळ्यामध्ये पार्किंगमधील दोन बसला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
वडाळ्यामध्ये पार्किंगमधील दोन बसला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
MMRDA आयुक्त आर ए राजीव यांना तीन महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय, 28 फेब्रुवारी रोजी आर ए राजीव निवृत्त होणार होते पण सरकरने मुदतवाढ दिली, काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्रांकडे राजीव यांच्याविरुद्ध पत्र लिहिले होते, त्यांना मुदत वाढ देऊ नये ही मागणी केली होती,
मुंबईतील ब्लॅक आऊट हा घातपात मुंबईत १२ ऑक्टोबरला झालेली बत्तीगुलमागे सायबर हल्ला, लाईट गेली यामागे चीनचा हात, न्यूयॉर्क टाईम्सचा दावा- गृहमंत्री अनिल देशमुख,
प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले कुटुंबासह ईडी कार्यालयात हजर
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील कोरोनाची लस घेणार असल्याची माहिती मिळतेय. शरद पवार जे.जे रूग्णालयात दाखल झाले असून लवकरच कोरोनाची लस घेणार.
कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ट्विटकरून दिली कोरोना झाल्याची माहिती.
नागपूर येथे स्नेहल फार्मा कंपनीला मोठी आग नागपूरमधील बुट्टीबोरीमध्ये असणाऱ्या स्नेहल फार्मा कंपनीला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ४ गाड्या दाखल झाल्या असून ही भीषण आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.
वरळीतील पबवर FIR दाखल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन केल्यानं वरळीतील पबवर कारवाई होणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री, स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली
नागपुरात ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणात तांत्रिक अडचण आल्याचे समोर आले आहे. लसीकरण केंद्रांवर सर्व्हर डाऊन असल्याने खोळंबा झाला आहे.
कराडमध्ये मराठा आरक्षणाच्या राज्यव्यापी साखळी ठिय्या आंदोलनात माथाडी नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचे उपोषण सुरु आहे. मराठा आरक्षण मागणीसाठी पाटण तहसील कार्यालयासमोर १९ दिवसांपासुन सुरु आहे साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन, आरक्षण मिळेपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु ठेवण्यावर असल्याच्या निर्णयावर आंदोलक ठाम असल्याचे सांगितले जात आहे.
६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी नोंदणी करताना कोविन अॅपमध्ये तांत्रिक अडचण येत आहे. सकाळपासून कोविन अॅपचं सर्व्हर डाऊन झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात तांत्रिक अडचणींच ग्रहण कायम असल्याचे दिसून येत आहे. 
देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाच्या मोहीमेला सुरुवात झाली. आतापर्यंत १ कोटीहून अधिक जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्चमाऱ्यांना लस देण्यात आली. आजपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहाटे एम्स रुग्णालयात कोरोना लसीचा पहिला डोस टोचून घेतला आहे. सविस्तर वाचा 
काही देशामध्ये नवा कोरोनाच्या स्ट्रेनमुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जगातील कोरोनाबाधितांची संख्या ११ कोटीच्या पार गेली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या ११ कोटी ४६ लाख ७४ हजारांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत २५ लाख ४२ हजार ५५६ जणांचा मृत्यू झाला असून ९ कोटी २ लाख २८ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. जगातील कोरोनाच्या यादीत अमेरिका अजूनही पहिल्या क्रमांकावर असून भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
First Published on: March 1, 2021 10:02 PM
Exit mobile version