Live Update: पंकजा मुंडे राज्यपाल कोश्यारींच्या भेटीला

Live Update:  पंकजा मुंडे राज्यपाल कोश्यारींच्या भेटीला
भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी आज राज्यपालांची भेट घेतली. महिलांच्या प्रश्नांवर राज्यपालांशी त्यांनी चर्चा केली.
पुण्यातील बिबेवाडी परिसरात भीषण आग लागली आहे. आगीतून रहिवाश्यांना सुखरुप घराबाहेर काढण्यात यश आले आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
देशातील कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील तिसऱ्या दिवशी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी आज कोरोना लस घेतली. कपिल देव यांनी जवळच्या फोर्टिस रुग्णालयात कोरोना लस टोचून घेतली.
मेघालयाचे राज्यपाल सत्या पाल मलिक यांनी कोरोनाची लस घेतली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. आरआर हॉस्पिटलमध्ये राष्ट्रपतींनी कोरोना लसीचा डोस टोचून घेतला.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.
शेतकरी मुद्द्यांवरून केंद्र आणि राज्य सरकारविरोधात आंदोलन उभं करणार असल्याची घोषणा स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी कोल्हापुरातून केली.
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक व निर्मात अनुराग कश्यप यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाचा छापा
एमबीबीएसची अंतिम वर्षाची परीक्षा ऑफलाईन होणार आहे. ८ मार्च परीक्षा होणार असून ही अंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती. महाराष्ट्र आयोग विज्ञान विभागाच्या बैठकीत एमबीबीएसची परीक्षा ऑफलाईनच होणार असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाबाधित विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर आयसोलेशनची वेगळ्या रुमची सोय करण्यात येणार आहे.
औरंगाबाद वाळुंज एमआयडीसीतील कामगार चौकातील ध्रुवतारा कंपनीला पहाटे भीषण आग लागली. या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अजूनही अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे.
जगातील कोरोनाबाधितांच्या आकड्याप्रमाणेच कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा देखील वाढत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ११ कोटी ५२ लाख ८३ हजारपार झाला आहे. यापैकी आतापर्यंत २५ लाख ५९ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ९ कोटी १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. काल (मंगळवार) राज्यात ७ हजार ८६३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात ५४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.४१ टक्के इतका झाला आहे. राज्यात काल एकूण ६ हजार ३३२ रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत २० लाख ३६ हजार ७९० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट हा आता ९३.८९ टक्के इतका झाला आहे. सविस्तर वाचा 
First Published on: March 3, 2021 4:26 PM
Exit mobile version