Live Update: मुंबईतील मानखुर्द येथील भंगार स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग

Live Update: मुंबईतील मानखुर्द येथील भंगार स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग

मुंबईतील मानखुर्द येथील भंगार स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग

मुंबईतील मानखुर्द येथील भंगार स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग लागली. मानखुर्दच्या मंडला परिसरात ही भीषण आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या दाखल झाली असल्याची माहिती मिळतेय. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.


सुप्रिम कोर्टाचा अभिनेता सोनू सूदला दिलासा

मुंबई महापालिकेनं बजावलेल्या नोटीस प्रकरणी अभिनेता सोनू सूदला सुप्रिम कोर्टाकडून दिलासा देण्यात आला आहे.


राज्यसभेच कामकाज : गाव, शेतकरी, गरीबांसाठी सरकार कटीबद्ध – केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर

इंधनदरवाढीविरोधात शिवसेनेचं मुंबईतील शिवसेना भवन समोर आंदोलन


मराठा आरक्षण: ८ मार्चपासून पुढील सुनावणी

मराठा आरक्षणासंदर्भात ८, ९ आणि १० मार्चला पुढील सुनावणी होणार असून याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद


मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायलयात सुनावणी सुरू

– प्रत्यक्ष सुनावणीचे मागणी मान्य होणार का? असा प्रश्न उपस्थितीत होत असून आम्हाला आणखी वेळ हवा आहे, महाराष्ट्र सरकाच्या वकिलांची मागणी

– 1 मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी सुरू करा, अशी राज्य सरकारची मागणी

-11 न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे सुनावणी वर्ग करा अशी मागणी देखील कपिल सिब्बल यांनी केली. तर सिब्बल यांच्या मागणीला राज्य सरकारच्या वकिलांचा पाठिंबा असल्याचेही सांगितले जात आहे.


सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत असताना कलाविश्वातील ड्रग्स प्रकरण समोर आलं. याप्रकरणात कलाविश्वातील अनेकांची नाव समोर आली आहेत. या अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांनादेखील अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता जगतप सिंग आनंदला अटक करण्यात आली आहे. जगतप सिंग आनंद हा मुंबईतील ड्रग्स व्यापारी असून तो ड्रग्स पेडलर केजो याचा भाऊ असल्याचे सांगितले जात आहे.


भारताने नाणे फेक जिंकून फलंदाजीचा घेतला निर्णय घेतला आहे.


मनसे आणि शिवसेनेत विरंप्पन गॅंग विरूद्ध टाईमपास टोळी असा वाद एकीकडे उफाळलेला असतानाच आज शुक्रवारी सकाळीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून थेट बाळासाहेबांच्या स्मारकाच्या विषयावरून शिवसेनेला टार्गेट केले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाचा रखडलेल्या विषयाच्या निमित्ताने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मनसेने याआधीच म्हणजे गुरूवारी फेरीवाल्यांकडून होणाऱ्या वसुलीचा विषय हा विरप्पन गॅंगचा कारनामा सांगत एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये शिवसैनिकांकडून मुंबईभर कशा पद्धतीने समांतर यंत्रणा उभारून सर्वसामान्य फेरीवाल्यांकडून पैसे उकळण्याचा सपाटा लावण्यात आला आहे असा आरोप शिवसैनिकांवर केला होता. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी चंबळ खोऱ्यातील राज्य मुंबईत आले काय असाही सवाल या पत्रकार परिषदेदरम्यान केला होता. तसेच या फेरीवाल्यांकडून पैसे वसुलीच्या मुद्द्याची चौकशी गृहमंत्र्यांनी करावी अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली होती. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेला उल्लेख टाईमपास टोळी असा केला होता.  मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनीही गुरूवारीच या विषयावर तीन ट्विट करत मनसेकडून आदित्य ठाकरे यांच्यावर झालेल्या टिप्पणीवर उत्तर दिले होते.


आज मराठा आरक्षणावर सुनावणी होणार असून या सुनावणीत काय होणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठा पुढे ही सुनावणी होणार आहे.

First Published on: February 5, 2021 11:06 AM
Exit mobile version