कोरोनाचे मूळ शोधण्यासाठी WHO चीनमध्ये

कोरोनाचे मूळ शोधण्यासाठी WHO चीनमध्ये

चीनच्या वूहान शहारतून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभर थैमान घातलं आहे. मात्र, हा विषाणू कसा आला? कुठून आला? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे दोन तज्ञ चीनमध्ये जाणार आहेत. WHO चे दोन तज्ञ पुढील दोन दिवस चीनची राजधानी बीजिंगमध्ये राहणार आहेत. तिथून ते याचा तपास सुरु करणार आहेत.

WHO च्या दोन तज्ज्ञांपैकी एक प्राणी तज्ञ आहे, तर दुसरे महामारी रोग तज्ञ आहेत. या तपासणी दरम्यान, हा विषाणू प्राण्यांमधून मानवांपर्यंत कसा आला याचा तपास केला जाणार आहे. हा विषाणू सुरुवातीला वटवाघळांमधून इतर प्राण्यांमध्ये गेला, त्यानंतर हा विषाणू मानवांपर्यंत पोहोचला, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.

यानंतर चीनने प्राण्यांच्या बाजारपेठेत आणि त्यांच्या विक्रीवर काही बदल केले आहेत. परंतु चीनच्या या बाजारपेठांवर जगभरातून टीका होत आहे. या दबावाच्या पार्श्वभूमीवर WHOने विषाणूचे मूळ जाणून घेण्यासाठी चीनला एक टीम पाठवण्याची घोषणा केली ज्यावर चीनने सहमती दर्शवली. मात्र, जगातील प्रत्येक देशात याची चौकशी व्हायला हवी असं चीनने म्हटलं. विशेष म्हणजे, कोरोना विषाणू प्रकरणावर WHO ने चीनला पाठिंबा दिल्याचा आरोप लावण्यात आले होते. यामुळे अमेरिकेने WHO मधून बाहेर पडली.

 

First Published on: July 10, 2020 4:11 PM
Exit mobile version