GoodNews! ‘सिरम’ची ‘कोविशील्ड’ लसीची चाचणी अंतिम टप्प्यात

GoodNews! ‘सिरम’ची ‘कोविशील्ड’ लसीची चाचणी अंतिम टप्प्यात

अमेरिका आणि रशियाने आपल्या कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची सुरुवातीचा निकाल जाहीर केला आहे. या देन्ही लसी ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचा दावा संबंधित औषध कंपन्यांनी केला. दरम्यान आता भारतातूनही खूशखबर मिळते आहे. सिरम इन्स्टिट्युटची कोविशील्ड लसीची चाचणी सध्या अंतिम टप्प्यात आहे. अंतिम टप्प्यातही ही लस यशस्वी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महिन्याअखेरपर्यंत कोविशील्ड लसीची चाचणी पूर्ण होईल. त्यामुळे कोरोना संसर्गावरील लस लवकरचं उपलब्ध होणार असल्याचे संकेत दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतात सुरू असलेल्या ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलची नोंदणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं दिली आहे. यासह अॅस्ट्रेझेनका आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीनं तयार केलेली ही लस. यामध्ये भारतातील पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाची भागीदारी आहे. दरम्यान, सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोवीशील्ड लशीच्या चाचणीचे परिणाम सकारात्मक येत आहेत. मुंबईत कोवीशील्ड लस दिलेल्यांपैकी कुणालाही साईड इफेक्ट झालेले दिसले नाहीत. मुंबईतमधील नायर आणि केईएम रूग्णालयात सुरू असलेल्या कोवीशील्ड लसीची आतापर्यंतची वाटचाल यशस्वी राहिली आहे. या लसीचा पहिला डोस दिल्यानंतर एक महिना उलटल्यानंतरही एकाही व्यक्तीला कोणतेही साईड इफेक्ट झाल्याचे समोर आले नव्हते.

सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदार पूनावाला यांनी पुढील वर्षात जानेवारीतच कोरोना लस येईल अशी शक्यता वर्तवली आहे. तसंच यूकेतील ट्रायलच्या परिणामांनुसार या लशीच्या आपात्कालीन वापराच्या मंजुरीसाठीही अर्ज केला जाण्याची शक्यता आहे. ऑक्सफोर्डची कोरोना लस प्रभावी आणि सुरक्षित ठरली तर सीरम इन्स्टि्युट या लशीचे १०० कोटी डोस तयार करणार आहेत. त्यातील ५० टक्के भारतासाठी आणि ५० टक्के गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना पुरवले जातील.


Pfizer Vaccine: युरोपियन युनियनकडून कोरोना लसीच्या वितरणास ग्रीन सिग्नल

First Published on: November 12, 2020 6:54 PM
Exit mobile version