Covishield Vaccine : कोविशील्ड लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्यांमध्ये आढळल्या ९० टक्के अँटिबॉडिज

Covishield Vaccine : कोविशील्ड लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्यांमध्ये आढळल्या ९० टक्के अँटिबॉडिज

देशात कोरोना विषाणूचे रूग्ण दिवसागणिक कमी होताना दिसत आहे. तसेच देशातील काही राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाला वेग आला आहे. एक दिलासादायक बाब म्हणजे कोविशील्ड लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्यांमध्ये ९० टक्के अँटिबॉडीज आढळून आल्या आहेत. तसेच तीन ते सात महिन्यानंतरही दोन्ही डोस घेतलेल्या ५०० हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना विषाणू विरोधात अँटिबॉडिज आढळून आल्या आहेत. मात्र, देशातील बहुतांश लोकांनी अद्यापही लसीचा दुसरा डोस घेतलेला नाहीये. त्यामुळे त्यांना बुस्टर डोस देणं योग्य ठरणार नाही. असं अहवालातून सांगितलं जात आहे.

५५८ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चाचणीत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ती म्हणजे त्यांच्यामध्ये अँटिबॉडिजचं प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक दिसून आलं आहे. परंतु कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्यात लस घेतलेल्या लोकांमध्ये अँटिबॉडिज अधिक प्रमाणात टिकून राहतात. असं डॉ. तांबे यांनी सांगितलं आहे. अवघ्या तीन महिन्यांनंतर ९६.७७ टक्के अँटिबॉडिज आढळून आल्या आहेत. तर सात महिन्यांनंतर यांचं प्रमाण ९१.८९ टक्के इतकं आढळून आलं आहे.

दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या सहाव्या सीरो सर्वेक्षणात ९० टक्क्यांहून अधिक लोकांच्या शरीरात कोरोनाविरूद्ध अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. दिल्लीत एकूण २८ हजार नमुने गोळा करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात सीरो पॉझिटिव्ह दर ८५ टक्क्यांहून अधिक असून त्यात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. जानेवारीमध्ये दिल्लीत झालेल्या पाचव्या सेरो सर्वेक्षणात ५६ टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्याने देशात कोरोना संसर्गाची लक्षणं कमी होत असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, मागील २४ तासांत कोरोनाचे ७ हजार ८१ इतके नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच ७ हजार ४६९ इतके जण कोरोनापासून बरे झाले आहेत. तर २६४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा : कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या तरुणाचे काँग्रेस कनेक्शन, भाजपाचा दावा


 

First Published on: December 19, 2021 4:12 PM
Exit mobile version