घरताज्या घडामोडीकर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या तरुणाचे काँग्रेस कनेक्शन, भाजपाचा दावा

कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या तरुणाचे काँग्रेस कनेक्शन, भाजपाचा दावा

Subscribe

कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. तर दुसरीकडे भाजपने एक धक्कादायक दावा केला आहे. तो म्हणजे कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या तरुणाचे काँग्रेस कनेक्शन असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे.

काँग्रेस कनेक्शन असलेल्या तरूणाचे कर्नाटकमधील बडे नेते डी.के. शिवकुमार यांच्यासह इतर नेत्यांचेही फोटो आहेत. तसेच हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रातील भाजपाचे नेते चांगलेच आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. भाजपाचे नेते सी.टी. रवी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाचा मी निषेध करतो. असं त्यांनी ट्विटच्या माध्यमातून लिहिलं आहे.

- Advertisement -

भाजपा नेते सी.टी.रवी यांचं ट्विट

काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाचा मी निषेध करतो. कर्नाटकमधील राजकीय वातावरण खराब करण्यासाठी हे कृत्य करण्यात आलं आहे. त्यामुळे या कृत्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना प्रश्न विचारण्याचे धाडस करतील का? असा सवाल भाजपा नेते सी.टी.रवी यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

कर्नाटकमधील भाजपाने यासंदर्भात एक ट्विट केलं होते. त्यालाच महाराष्ट्रातील भाजपानेही रिट्वीट केलं आहे. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात काँग्रेसचा हात असेल आणि शिवसेना त्याला मूक संमती देत असेल, तर शिवरायांच्या सिंहासनापेक्षा लाचारीने मिळविलेल्या सत्तेची खुर्ची शिवसेनेला अधिक प्रिय वाटत आहे. हा शिवसेनेच्या लाचारीचा सर्वोच्च बिंदू आहे. असं म्हणत महाराष्ट्रातील भाजपाने सत्ताधारी पक्ष शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -