Omicron Variant: जगात ओमिक्रॉनची दुसरी लाट; कोविशिल्ड, बूस्टर डोसबाबत सरकार नियम बदलण्याची शक्यता

Omicron Variant: जगात ओमिक्रॉनची दुसरी लाट; कोविशिल्ड, बूस्टर डोसबाबत सरकार नियम बदलण्याची शक्यता

चीनमध्ये ओमिक्रॉनच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. रविवारी उत्तर-पूर्व भागात निर्बंध लावले आणि लाखों लोकांना घरातच राहण्यास सक्त मनाई केली आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटने चीनमध्ये धुमाकूळ घातला असून आतापर्यंतचे सर्वात मोठे संकट उभे केले आहे. तसेच ब्रिटन, अमेरिका, इस्रायल सारख्या देशांमध्ये कोरोना लसीचे तीन-तीन डोस दिले गेले आहेत. पण आता चौथा डोस देण्याची परवानगी दिली जाणार असून त्याची तयारी केली जात आहे. या अनुषंगाने भारतात कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतरात घट करून ८ आठवडे करण्याची शिफारस केली गेली आहे. शिवाय सरकार बूस्टर डोस वाढवून वेगाने देण्याचा विचार करत आहे.

लसीकरणावरील देशातील सर्वोच्च तांत्रिक सल्लागार गट (NTAGI)ने कोरोना प्रतिबंधात्मक लस कोविशिल्डच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये अंतरात घट करून ८ ते १६ आठवडे करण्याची शिफारस केली आहे. सध्या कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवड्यादरम्यान दिला जातो. दरम्यान एनटीएजीआयने अजूनपर्यंत भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा डोसचा कालावधी बदलण्याची शिफारस दिली नाही. कोव्हॅक्सिनचा दुसऱ्या डोस हा पहिल्या डोसच्या २८ दिवसांनंतर दिला जातो.

दरम्यान केंद्र सरकार बूस्टर डोस देण्याची व्याप्ती वाढवण्याचा विचार करत आहे. सरकारी सुत्राने सांगितले की, शेजारी देश चीनसह जगातील काही देशांमध्ये ओमिक्रॉनच्या दुसऱ्या लाटेचे वाढणारे संकट लक्षात घेऊन लसीच्या तिसऱ्या डोसच्या आवश्यकतेचा अभ्यास केला जात आहे. सरकार तिसरा डोस म्हणजे बूस्टर डोससाठी किमान वय कमी करण्याची शक्यताही सरकार शोधत आहे.


हेही वाचा – Diesel Price Hike: डिझेलचे दर २५ रुपयांनी महागले; सध्याचा एक लीटरचा दर किती?


 

First Published on: March 21, 2022 12:34 PM
Exit mobile version