घरताज्या घडामोडीDiesel Price Hike: डिझेलचे दर २५ रुपयांनी महागले; सध्याचा एक लीटरचा दर...

Diesel Price Hike: डिझेलचे दर २५ रुपयांनी महागले; सध्याचा एक लीटरचा दर किती?

Subscribe

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढणाऱ्या किंमतींचा भार कमी करण्यासाठी डिझेलचे दर २५ रुपये प्रति लीटर वाढवले आहे. आता पेट्रोल पंपावर घाऊक ग्राहकांना (Wholesale Consumers) डिझेल २५ रुपये महाग मिळेल. दरम्यान बस ऑपरेटरकडून आणि मॉलमध्ये वापर होणाऱ्या डिझेलच्या खरेदीत होणारी गडबड आणि तोटा भरून काढण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. आता या बस ऑपरेटकरना आणि मॉल्सला डिझेल खरेदी करण्यासाठी २५ रुपये अधिक मोजावे लागणार आहे. याचा किरकोळ ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.

कसा डिझेल खरेदीत केली जात होती गडबड?

दिल्लीत पेट्रोल पंपवर डिझेलची किरकोळ किंमत ८६.६७ रुपये प्रति लीटर आहे, तर मॉल्स, बससारख्या व्यवसायात  मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणाऱ्या डिझेलची किंमत ११५ रुपये प्रति लीटर आहे. जवळपास २५ रुपयांच्या मोठ्या फरकामुळे मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करण्यासाठी कंपनी ऐवजी पेट्रोल पंपवर जात होते. यामुळे डिझेलची मोठ्या प्रमाणात विक्री करणाऱ्या कंपनी नायरा एनर्जी, जियो-बीपी आणि शेल यांना खूप नुकसान झाले.

- Advertisement -

अचानक वाढली पेट्रोल पंपवर विक्री?

मार्चमध्ये पेट्रोल पंपवरील डिझेल विक्रीत २० टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली. कारण बस ऑपरेटर आणि मॉल्सचे मालक थेट कंपनीऐवजी पेट्रोल पंपवर स्वस्त डिझेल खरेदी करत होते. यामुळे मोठ्या प्रमाणात डिझेल विक्री करणाऱ्या कंपन्याचा तोटा होत होता. त्यामुळे आता पेट्रोल पंपवर मोठ्या प्रमाणात विक्री होणाऱ्या डिझेलची किंमती २५ रुपये प्रति लीटर वाढवण्यात आली आहे.


हेही वाचा – Pakistan: पाकिस्तानमध्ये ७० वर्षातील रेकॉर्ड ब्रेक महागाई; पेट्रोल, दुधाचे दर १५० रुपये पार

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -