भारत-चीन सीमावादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही लष्कर प्रमुखांची बैठक

भारत-चीन सीमावादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही लष्कर प्रमुखांची बैठक

भारत-चीनमधील सीमावाद चांगलाच उफाळला आहे लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलिकडे हद्दीत चीनी सैन्याच्या लष्करी हालचाली वाढल्याने भारत आणि चीनदरम्यान तणाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही देशांनी आपल्यातील मतभेदांना वादामध्ये रुपांतरीत न करता चर्चेतून मार्ग काढण्या विचार केल आहे. त्यामुळे दोन्ही देशातील लष्कर अधिकाऱ्यांची बैठक आज आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक सकाळी ११ च्या दरम्यान सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. ही बैठक चीनच्या मोलडो-चुशूल स्थित बीपीएम हटमध्ये होणार असून भारताकडून लेफ्टनेंट जनरल हरिंदर सिंह हे बैठकीचे नेतृत्व करणार आहेत.

दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्रालयांनी चर्चा

काल भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची चर्चा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाली. परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव (पूर्व आशिया) नवीन श्रीवास्तव यांनी चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक वू जियांगाव यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत दोन्ही देशांच्या भावनांचा आदर केला पाहिजे यावर एकमत झाले. तसेच परस्पर सामंजस्यातून आणि शांततेने चर्चा करुन तणावावर तोडगा काढला पाहिजे यावरही अधिकाऱ्यांचे एकमत झाले. दरम्यान, पूर्व लडाखमधील पँगाँग त्सो, डेमचोक आणि गलवान खोरे या भागात चिनी सैनिकांनी घुसखोरी केली आहे. त्यांना त्यांच्या हद्दीत परत पाठवण्यासाठी भारतीय सैन्य प्रयत्नशील आहे. यावरून दोन्ही सैन्यांमध्ये तणाव उद्भवला आहे. आतापर्यंत चर्चेच्या दहा फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत.

हेही वाचा –

लॉकडाऊन फेल, राहुल गांधींनी शेअर केला स्पेन, जर्मनी, इटली आणि भारताचा आलेख

First Published on: June 6, 2020 11:28 AM
Exit mobile version