कोणताही संभ्रम नाही, कोरोना हवेतून पसरू शकतो; CSIRनं केलं मान्य!

कोणताही संभ्रम नाही, कोरोना हवेतून पसरू शकतो; CSIRनं केलं मान्य!

Corona Update: राज्यात कोरोना रुग्णांनी पार केला २० लाखांचा आकडा

गेल्या काही दिवसांपासून कोरोना नक्की हवेतून पसरतो की नाही, यावर बरीच चर्चा सुरू होती. WHO अर्थात जागतिक आरोग्य परिषदेकडून हवेतून कोरोना पसरत असल्याची काही प्रकरणं समोर आल्याचं मान्य केलं होतं. तरी व्यापक प्रमाणात त्याला मान्यता मिळाली नव्हती. भारतात देखील या दाव्यावरून तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर भारतातील विज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या CSIR अर्थात Council of Scientific & Industrial Research ने ही बाब मान्य केली असून त्यासंदर्भात लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सीएसआयआरचे प्रमुख शेखर सी. मंडे यांनी याबाबत ब्लॉगपोस्ट करून अधिक सविस्तर माहिती दिली आहे.

CSIRचं शिक्कामोर्तब

कोरोना हवेतून पसरतो किंवा नाही, यावर अनेक संशोधनं आजवर करण्यात आली आहेत. त्यासंदर्भातले काही निष्कर्ष आता समोर आले असून कोरोनाच्या SARS-CoV-2 या व्हायरसचं हवेतून संक्रमण होत असल्यावर या निष्कर्षांमधून शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे आता CSIRकडून देखील नागरिकांनी सतर्कता घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

यासंदर्भात शेखर यांनी म्हटल्याप्रमाणे घर, खोली, कार्यालय अशा बंद ठिकाणी देखील मास्कचा वापर करणं आवश्यक आहे. हवेतून विषाणू पसरू शकत असल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणं देखील टाळायला हवं. शिवाय, घर किंवा कार्यालयासारख्या ठिकाणी हवा खेळती राहील, याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

First Published on: July 21, 2020 3:43 PM
Exit mobile version