तालिबानला CSTO चा इशारा : सीमांवरील परिस्थिती बिघडल्यास सर्व देश देणार प्रत्युत्तर

तालिबानला CSTO चा इशारा : सीमांवरील परिस्थिती बिघडल्यास सर्व देश देणार प्रत्युत्तर

अफगाणिस्थानात तालिबान्यांनी आपले राज्य निर्माण केल्याने दक्षिण आणि मध्य आशियातील समीकरणांवरही याचा परिणाम झाला आहे. त्यातच अफगाणिस्तानच्या शेजारील आश्रितांचा मोठा जमाव ताजिकिस्तानची राजधानी असलेल्या दुशांबेमध्ये तयार होतोय. यासंदर्भात शांघाय सहकार्य संघटनांच्या प्रमुखांच्या बैठकीत गंभीर चर्चा झाली. अफगाणिस्तानातल्या परिस्थितीमुळे जर ताजिकिस्तानच्या दक्षिण सीमेवरील स्थिती बिघडली तर सर्व देश लष्करी मदतीसाठी संघटितपणे एकत्र येतील, असा इशारा CSTO विदेश मंत्र्यांच्या आज झालेल्या बैठकीत देण्यात आला.

या बैठकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन सहभागी होणार आहेत. तर, भारतीय विदेश मंत्री एस. जयशंकर स्वतः प्रतिनिधी म्हणून बैठकीसाठी १६ सप्टेंबरला रवाना होणार आहेत. इराणसह भारताप्रमाणेच सद्यस्थितीबाबत ज्या देशांना चिंता वाटतेय, त्या देशांचे प्रतिनिधीदेखील सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या बैठकीसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानदेखील संपूर्ण तयारीसह ताजिकिस्तानात पोहोचणार आहेत.

ताजिकिस्तानला सर्वाधिक चिंता

अफगाणिस्तानातील तालिबान सत्तेमुळे सर्वाधिक चिंता ताजिकिस्तानला आहे. कारण, अफगाणिस्तानात ताजिक वंशाच्या नागरिकांची मोठी लोकसंख्या राहतेय. तरीदेखील त्यांना सत्तेत कोणताही हिस्सा देण्यात आलेला नाही, तसेच तालिबान्यांच्या अत्याचारामुळे हे नागरिक त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे ताजिकिस्तानवर अधिक दबाव राहणार आहे. पंजशेर भागातल्या ताजिक वंशाच्या तालिबानविरोधी एनआरएफला ताजिकिस्तानचं समर्थन आहे. त्यामुळे तालिबान्यांपुढील आव्हानही वाढणार आहे. दरम्यान रुसचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी सुरक्षेच्या अनुषंगाने रुससह अन्य मध्य आशियाई देशांच्या सुरक्षा संघटन CSTO ची महत्त्वाची बैठक होणार आहे.

First Published on: September 15, 2021 9:56 PM
Exit mobile version