Live Update : चिंता कायम! राज्यात आज ३४ हजारांहून नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर ५९४ मृत्यू

Live Update : चिंता कायम! राज्यात आज ३४ हजारांहून नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर ५९४ मृत्यू

Live update Mumbai Maharashtra

चिंता कायम! राज्यात आज ३४ हजारांहून नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर ५९४ मृत्यू

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढीला ब्रेक लावण्यात यश मिळत असतानाच आज रुग्णसंख्येच पुन्हा मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णसंख्याही ३० हजारांहून अधिक झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ३४ हजार ०३१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५९४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत गेल्याकाही दिवसांपासून चढउतार पाहयला मिळत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. तर राज्यात आज ५१ हजार ४५७ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत.
मुंबईत २४ तासात १ हजार ३५० नवे रुग्ण,५७ जणांचा मृत्यू
पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा निर्णय तूर्तास मागे, ठाकरे सरकारचा निर्णय मागासवर्गीयांच्या पद्दोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयामुळे बराच वाद झाला होता. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय स्थगित करण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या शुक्रवारी कोकणात जाणारअसून तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार
तौक्ते चक्रीवादळामुळे बार्ज P-305 वरील १८४ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली. तर बेपत्ता ७७ पैकी ३४ कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

बॉम्बे हायजवळ बार्ज P305 मधील आतापर्यंत १८४ जणांची सुटका कऱण्यात आली आहे. वाचवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना घेऊन आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता मुंबई बंदराकडे परतत आहेत. आयएनएस तेग, आयएनएस बेतवा, आयएनएस ब्यास P81आणि सी किंग हेलिकॉप्टर द्वारे बचाव कार्य अद्याप सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
सिंधुदुर्गात तौक्ते चक्रीवादळाचा रेडी बंदराला फटका बसला असून रेडी बंदरातील दोन मालवाहू जहाज बुडाली तर दोन जहाज नादुरुस्त झाली आहेत. मात्र सुदैवाने जिवीतहानी झालेली नाही. चक्रीवादळात रेडी बंदरातून वाहतूक करणाऱ्या दोन जहाजांना जलसमाधी मिळाली आहे. तर दोन जहाजचं मोठं नुकसान झाले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून तौक्ते वादळाने गुजरात आणि दीवला झोडपून काढलं आहे. त्यामुळे या परिसराचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात आणि दीवमधील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी थोड्याच वेळात गुजरातला दाखल होणार असून गुजरातच्या भावनगर येथून ते हवाई पाहणी करणार आहेत.
पुण्यातील ४५ वर्षीय नागरिक, आरोग्य कर्मचारी यांना कोरोनाचा दुसरा डोस मिळणार
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात तीन दिवसीय पाहणी दौऱ्यावर आहेत. याच्यासह विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर देखील असणार आहे. आजपासून फडणवीस, दरेकर वादळग्रस्त भागाचा दौरा करणार
पाच कोटी लसींच्या खरेदीसाठी राज्य सरकारने टेंडर पाच कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या खरेदीसाठी राज्य सरकारने ग्लोबल टेंडर काढले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील उपलब्ध लसींबाबत हे टेंडर असून यासाठी आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. केंद्र सरकारने लस आयतीला परवानगी दिल्यानंतर राज्याने ग्लोबल टेंडर काढले आहे. लस उत्पादक किती लसी देणार, त्या किती दिवसात देणार आणि दर काय असतील याबाबत राज्य सरकार निविदा काढणार
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरतं स्थगित केलेलं मुंबईतलं लसीकरण आजपासून पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. मुंबईतलं सर्वात मोठं लसीकरण केंद्र असलेल्या बीकेसी जम्बो कोविड लसीकरण केंद्रात सकाळी १० नंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० डोस दिले जाणार आहेत. ज्यात पहिला डोस घेणाऱ्यांसाठी कोविशील्ड ही लस उपलब्ध असेल.
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम रेल्वेने त्यांच्या विभागातून होणाऱ्या २७ रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १६ ते २१ मे दरम्यान पश्चिम रेल्वे वरून धावणाऱ्या गाड्यांचा यात समावेश असून २० हजार ७०० प्रवाशांनी आपले तिकीट आरक्षित केले होते. मात्र रेल्वेच रद्द झाल्याने त्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने तिकीटाची पूर्ण रक्कम परत केली असल्याचे सांगितले जात आहे. याव्यतिरिक्त, जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या सूचनाचा पश्चिम रेल्वेकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
तेलंगणामध्ये कोरोना व्हायरस महामारीच्या प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यााठी राज्य सरकारनं लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता तेलंगणात ३० मेपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. आधी तेलंगणा सरकारनं २२ मेपर्यंत लॉकडाऊन लागू केला होता. यामध्ये दररोज सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत नागरिकांना अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी सूट देण्यात आली होती.
मुंबईत आज बुधवारी हवामान ढगाळलेले राहणार, काही ठिकाणी मेघगर्जना, वाऱ्यासह पाऊस होणार. येत्या दोन दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार असून १ जूनला केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
खासदार संभाजी राजे छत्रपती आज नाशिक दौऱ्यावर. या दौऱ्यात मराठा आरक्षणावर आपली भूमिका जाहीर करणार की नाही ? याकडे राज्याचं लक्ष.
हिंगोलीत अनेक गावांना भूकंपाचे धक्के बसले असून जिल्ह्यात काही वर्षांपासून भुंकपाचे धक्के बसत आहेत. येथे बसणाऱ्या धक्क्यांची नोंह लातूर येथील भुंकप मापक केंद्रात अनेक वेळा झाली आहे. सकाळी साजेसहाच्या दरम्यान एका पाठोपाठ पाच ते सहा वेळा आवाज झाला. यावेळी वसमत व औंढानागनाथ तालुक्यातील अनेक गावांमध्ये जमीन हादरली. यामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण.
नाशिक महापालिकेच्या बिटको रुग्णालयात आयसीयूमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ४ व्हेंटिलेटर बंद, वेळीच प्रकार लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला.
First Published on: May 19, 2021 9:27 PM
Exit mobile version