राफेल प्रकरण: ‘राहुल गांधींचे सगळे आरोप निरर्थक’

राफेल प्रकरण: ‘राहुल गांधींचे सगळे आरोप निरर्थक’

राफेल विमानाच्या खरेदी घोटाळ्याचे प्रकरण सध्या गाजते आहे. राफेल प्रकरणावरुन सध्या विविध चर्चांना उधाण आलं आहे. २०१९ च्या निवडणुकांपूर्वी राजकीय वर्तुळातही या मुद्द्यावरुवन वादळ उठले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तर राफेल घोटाळा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अनिल अंबानी यांचं साटलोटं असल्याचा थेट आरोप केला होता. तसंच राफेल विमानांची निर्मिती करणाऱ्या ‘द सॉल्ट’ या विमान कंपनीचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप राहुल गांधींनी एका भाषणादरम्यान केला होता. मात्र, द सॉल्ट कंपनीचे मुख्य अधिकारी इरीक ट्रॅपर यांनी यावर प्रत्युत्तर देत, राहुल गांधींनी केलेले सर्व आरोप निरर्थक असल्याचं म्हटलं आहे. ‘राहुल गांधीनी लावलेले सगळे आरोप खोटे असून त्यात काहीच तथ्य नाही’, अशा शब्दात इरीक पॅटर यांनी सर्व आरोपांचं खंडन केलं आहे. याविषयी स्पष्टीकरण देताना पॅटर म्हणाले, की ‘मी कोणत्याही राजकीय अधिकाऱ्यासाठी वा पक्षासाठी काम करत नाही. मी ज्या पदावर काम करतो त्या पदाचं मला भान आहे, असंही ते म्हणाले.


Video: वादग्रस्त ‘राफेल’ विमानाची आकाशात भरारी

राहुल गांधीच्या आरोपांचे खंडन करत इरीक पॅटर म्हणाले, की ‘द सॉल्ट कंपनीमध्ये मी एका मोठ्या जबाबदारीच्या पदावर काम करतो. या पदावर राहून मी खोटं बोलण्याचा किंवा लांडीलबाडी करण्याच विचारही करु शकत नाही. अगदी जवाहरलाल नेहरुंपासून काँग्रेस पक्षासोबत काम करण्याचा आमचा अनुभव आहे. अनेक वर्ष मी काँग्रेससोबत काम केलं आहे पण राहुल गांधींनी लावलेल्या या आरोपांमुळे मी खूप दुखावलो आहे’. याशिवाय त्यांनी यावेळी रिलायन्ससोबत आपला राफेल विमानाच्या निर्मितीचा करार झाला असल्याचेही यावेळी स्पष्ट सांगतिले. विमान खरेदी करण्याचा हा करार दोन्ही देशांमध्ये स्वस्त दरात झाल्याचेही ते म्हणाले.

भारत खरेदी करणार ३६ राफेल

उपलब्ध माहितीनुसार, भारत फ्रान्सकडून एकूण ३६ राफेल विमानं खरेदी करणार आहे. राफेल विमानाची निर्मीती करणाऱ्या ‘द सॉल्ट’ या एव्हिएशन कंपनीने रिलायन्स कंपनीसोबत याबाबत करारही केला आहे. राफेल हे एक उच्च दर्जाचे लढाऊ विमान असल्याचा दावा केला जातो. विशेष म्हणजे भारत खरेदी करणार असलेल्या या विमानांची निर्मीती भारतातच होणार आहे.

First Published on: November 13, 2018 4:36 PM
Exit mobile version