सख्ख्या बहिणी असल्यास एकीची शालेय फी सरकार भरणार; योगी सरकारचा मोठा निर्णय

सख्ख्या बहिणी असल्यास एकीची शालेय फी सरकार भरणार; योगी सरकारचा मोठा निर्णय

उत्तर प्रदेशातील प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण आता योगी सरकार शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींपैकी एका मुलीची फीस सरकार भरणार आहे. याबाबत अद्याप उत्तर प्रदेश सरकारने अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु, सरकारच्या या निर्णयामुळे पालकांवर आर्थिक बोजा कमी होण्यास मदत होणार आहे. (Daughters Studying Private Schools Yogi Government Will Pay Fees Of One Daughter May Be Announced Soon)

“कोणत्या शाळेमध्ये दोन सख्ख्या बहिणी शिकत असतील तर, त्यापैकी एकीची फीस शालेय प्रशासनाने माफ करावी. जर शालेय प्रशासनाला फीस माफ करणं शक्य नसेल तर उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने एका बहिणीची फीस भरली जाईल”, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जसजसे लाभार्थी वढतील तसे निधींमध्ये वाढ करण्याचा सरकारचा विचार आहे. सध्या उत्तर प्रदेशमध्ये याच योजनेची चर्चा आहे. मुलींच्या शिक्षणासाठी योगी सरकारने हे मोठं पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, यूपी ग्लोबल इन्वेस्टर्स समिटनंतर विधानसभेमध्ये बजेट सादर होणार आहे. यावेळी मुलींच्या शिक्षणासंदर्भातील प्रस्ताव मंजूर होईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रस्तावाला मान्यता मिळाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नुकताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले होते. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक युपीमध्ये नेण्याचा मानस त्यांना आखला होता. त्या पाश्वभूमीवर योगींनी हा दौरा केला असून, त्यांचा हा दौरा यशस्वीही ठरला. कारण या दोन दिवसांच्या दौऱ्यात योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशमध्ये ५ लाख कोटींची गुंतवणूक घेऊन गेले आहेत.


हेही वाचा – बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी आजपासून पाच दिवस संपावर?

First Published on: January 27, 2023 8:24 AM
Exit mobile version