बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी आजपासून पाच दिवस संपावर?

देशातील सर्व बँकांनी महिन्याच्या शेवटी म्हणजेच 30 आणि 31 जानेवारी रोजी संपाचा इशारा दिला आहे. त्यापूर्वी विकेंड असल्याने बँकांचा संप एकूण चार दिवस असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे. अशातच आज देशभरातील बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.

देशातील सर्व बँकांनी महिन्याच्या शेवटी म्हणजेच 30 आणि 31 जानेवारी रोजी संपाचा इशारा दिला आहे. त्यापूर्वी विकेंड असल्याने बँकांचा संप एकूण चार दिवस असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे. अशातच आज देशभरातील बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. नोकर भरतीच्या प्रश्नावर संपूर्ण देशातल्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचारी आज एक दिवसीय संपावर जाणार आहेत. (bank of maharashtra employees on strike from today aggressive stance to demand recruitment)

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सध्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. परिणामी कामाचा ताणा इतर कर्मचाऱ्यांवर अधिक प्रमाणात येत आहे. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवत नसल्याचा आरोप बॅंक संघटनेकडून करण्यात येत आहे. तसेच, बॅंकेचा कारभार 250 पटीनं वाढला आहे, सोबतच अनेक शाखा देखील वाढल्या आहेत, तरीही कर्मचारी संख्या मात्र वाढवली जात नाही असा आरोप कर्मचारी संघटनेकडून करण्यात आला आहे. यावर तोडगा काढावा अशी मागणी करत बँकेच्या कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय संप पुकारला आहे.

राज्यात बँक ऑफ महाराष्ट्राच्या एकूण 700 शाखा असून कर्मचाऱ्यांची संख्या 13 हजार इतकी आहे. युनायटेड फोरम ऑफ महा बँक युनियनकडून एक परिपत्रक काढत देशव्यापी संपाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, देशातील सर्व बँकांकडून 30 आणि 31 जानेवारी रोजी संपाचा इशारा देण्यात आला असून, याबाबत आज एक बैठक होणार आहे. ही बैठक अयशस्वी ठरल्यास बॅंक ऑफ महाराष्ट्र 27 जानेवारीपासून ते 31 जानेवारीपर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच तब्बल ५ दिवस बँक बंद राहण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – पुण्यातील हत्याकांडाचे गूढ वाढले, पुरलेले मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले