डेव्हिड आणि व्हिक्टोरिया बेकहॅमचे ‘राजेशाही’ दान!

डेव्हिड आणि व्हिक्टोरिया बेकहॅमचे ‘राजेशाही’ दान!

डेव्हिड आणि व्हिक्टोरिया बेकहॅम

इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम आणि त्याची पत्नी व्हिक्टोरिया बेकहॅम आपले ब्रिटनच्या प्रिन्सच्या शाही लग्नात परिधान केलेले कपडे मँचेस्टर बॉम्बस्फोटमधील पीडितांसाठी पैसे उभारण्याकरता दान करणार आहेत. एका ऑनलाईन साइटवरून ह्या कपडयांची विक्री होणार आहे.

काय होता या जोडप्याचा खास पोशाख!

डेव्हिडने एक ग्रे रंगाचा सूट घातला होता. ज्यात आत एक वेस्टकोटही त्याने परिधान केला होता. तर व्हिक्टोरियाने स्वत: डिझाइन केलेला एक नेव्ही ब्लू कलरचा गाउन घातला होता.

डेव्हिड बेकहॅम आणि त्याची पत्नी व्हिक्टोरिया बेकहॅम

डेव्हिडकडून मदतीचे आवाहन

यावेळी डेव्हिडला विचारले असता त्याने सांगितले की, “आमचे हे कपडे दान करुन मिळणारी रक्कम ‘मँचेस्टर इमर्जन्सी फंड’ला दान करण्यात येणार आहे. तसेच, या फंडसाठी सर्वांनी आपापल्या परीने मदत करावी,” असं आवाहनही डेव्हिडने केलं आहे.

डेव्हिडकडून मदतीचे आवाहन

मँचेस्टर एरिना बॉम्बब्लास्ट

२२ मे, २०१७ रोजी युनायटेड किंग्डमच्या मँचेस्टर शहरात एक आत्मघाती बॉम्बहल्ला झाला होता. अमेरिकन सिंगर एरियाना ग्रान्देच्या कॉन्सर्टनंतर मँचेस्टर एरिनामधून बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांवर हा हल्ला करण्यात आला. या घटनेला एक दहशतवादी कारवाई म्हणून घोषित केले गेले.

मँचेस्टर बॉंम्बब्लास्ट

राजेशाही लग्नाला अनेक सेलिब्रिटीजची उपस्थिती१९ मे रोजी क्वीन एलिझाबेथ-२ हिच्या चार्ल्स नावाच्या मुलाचा लहान मुलगा प्रिन्स हॅरीचे लग्न अभिनेत्री मेघान मार्ले हीच्याशी झाला. हे लग्न सेंट जॉर्ज चॅपल, विंडसर कॅस्टल येथे पार पडले. या लग्नाला मोठमोठ्या सेलिब्रिटीजना आमंत्रित करण्यात आले होते. जॉर्ज क्लोनी, ओपरा विन्फ्रे, डेव्हिड बेकहॅम यांच्यासह अनेक सेलिब्रिटीजने उपस्थिती लावली होती.

First Published on: June 8, 2018 1:52 PM
Exit mobile version