अरे, आता म्हणे दाऊद पाकिस्तानमध्ये नाहीच!

अरे, आता म्हणे दाऊद पाकिस्तानमध्ये नाहीच!

दाऊद इब्राहिम कराचीत असल्याचा दावा आता पाकिस्ताननं फेटाळून लावला आहे. दाऊद इब्राहिम कराचीत असल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी प्रसिध्द केलेलं वृत्त निराधार असल्याचं पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. दाऊद कराचीत असल्याचा दावा नाकारला आहे.

पाकिस्तान सरकारने शनिवारी देशाला एफएटीएफच्या (FATF) ग्रे यादीतून बाहेर काढण्यासाठी बंदी घातलेले ८८ दहशतवादी गट आणि हाफिज सईद, मसूद अझर आणि दाऊद इब्राहिमवर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. यावेळी पाकिस्तानने कबूल केले की अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम देशात आहे आणि तो कराचीमध्ये राहतो असं म्हटलं होतं.

पाकिस्तानने दहशतवाद्यांची यादी जाहीर केली होती. या यादीनुसार दाऊद इब्राहिम कराची येथे राहत आहे. या यादीमध्ये दाऊद इब्राहिमचा पत्ता व्हाइट हाऊस, कराची असा लिहिलेला आहे. यूएन ची यादी जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानने ही बंदी लादली आहे. पाकिस्तान सरकारने दाऊद इब्राहिमची खाती सील करण्याबरोबरच संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

दाऊद कराचीमध्ये असल्याचा अधिसूचनेनंतर हे वृत्त सगळीकडे प्रसिध्द झालं आहे. दाऊदच्या कराचीमधील वास्तव्याच्या माहितीवरून अडचणीत आलेल्या पाकिस्ताननं दाऊद कराची रहात नसल्याचं म्हटलं आहे. माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तावर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे, दाऊद पाकिस्तानात नाही. काही वृत्तांमध्ये म्हटलं आहे की पाकिस्तान निर्बंध घालत असून, दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचा दावा केला आहे. तो चुकीचा आहे आणि निरर्थक आहे. त्यात कोणतीही सत्यता नाही.

First Published on: August 23, 2020 9:42 AM
Exit mobile version