महिला आयोगाच्या अध्यक्षांचा स्पा मसाजसाठी मेसेज, मात्र मिळाली कॉलगर्ल्सची लिस्ट

महिला आयोगाच्या अध्यक्षांचा स्पा मसाजसाठी मेसेज, मात्र मिळाली कॉलगर्ल्सची लिस्ट

एकमेकांना जोडण्याचे काम करणाऱ्या सोशल मीडियाचा वापर हल्ली अवैध धंद्यांसाठी केला जातोय. याचाच एक पुरावा आता दिल्ली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्या हाती लागला आहे. स्वाती मालीवाल यांना जस्ट डायल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्पा मसाज पार्लरची माहिती मिळवण्यासाठी एक मेसेज केला होता. मात्र या मेसेजवर पुढे त्यांना जे सांगण्यात आले ते धक्कादायक होते. स्वाती मालीवाल यांना त्या मेसेजनंतर जस्ट डायलवरून १५० हून अधिक कॉलगर्ल्सचे रेट सांगण्यात आले.

स्वाती मालीवाल यांनी ट्विटरवरून दिली माहिती

या घटनेची माहिती स्वाती मालीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. स्वाती मालीवाल यांनी ट्वविट केले की, आम्ही जस्ट डायलवर कॉल करून स्पा मसाजची खोटी चौकशी केली, यानंतर आमच्या फोनवर ५० असे मेसेजे आले ज्यात १५० हून अधिक कॉलगर्ल्सचे रेट सांगण्यात आले होते. यामुळे जस्ट डायल आणि दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला समन्स जारी केला आहे. जस्ट डायलची अशा धंद्यांना चालना देण्यामागची भूमिका काय आहे?

दिल्ली पोलीस -जस्ट डायला समन्स

मालीवाल यांनी पुढे म्हटले की, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी यासाठी समन्स जारी केला आहे. जस्ट डायल स्वत: या प्रकरणात एक पक्ष आहे. माझ्याकडून शक्य तेवढी मी कारवाई करणार. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. हे खपवून घेतले जाणार नाही.

दरम्यान दिल्लीत स्पा आणि मसाज पार्लरच्या नावाखाली अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरु आहेत. त्यामुशे दिल्ली पोलिसांकडून ठिकठिकाणी छापेमारी करत कारवाई केली जात आहे.


Mumbai Antop Hill : अँटॉप हिलमध्ये तीन घरे कोसळली, ९ जणांना ढिगाऱ्यातून काढले बाहेर

 

First Published on: November 9, 2021 11:54 AM
Exit mobile version