घरमुंबईMumbai Antop Hill : अँटॉप हिलमध्ये तीन घरे कोसळली, ९ जणांना ढिगाऱ्यातून...

Mumbai Antop Hill : अँटॉप हिलमध्ये तीन घरे कोसळली, ९ जणांना ढिगाऱ्यातून काढले बाहेर

Subscribe

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात तीन घरं कोसळली आहेत. आज सकाळी ८ च्या सुमारास अँटॉप हिलमधील कोकरी आगर, जय महाराष्ट्र नगर झोपडपट्टीत ही ३ घरे कोसळली आहेत. यावेळी ढिगाऱ्यातून ९ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन विभाग आणि एन्टोफिल पोलिसांनी यश आले आहे. या ९ जणांमध्ये ४ पुरुष, २ महिला आणि ३ मुलांचा समावेश आहे.

G+2, G+2, G+1 अग्निशमन विभाग आणि एन्टोफिल पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घरात अडकलेल्या ९ जणांना बाहेर काढले. याप्रकरणी अँटॉप हिल पोलिसांकडून तपास सुरु आहे. या ढिगाऱ्यातून बाहेर काढलेल्या ६ जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ढिगाऱ्याखाली आणखी कोणीही अडकल्याची माहिती नाही. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आत्ता ढिगारा बाजूला करण्य़ाचे काम सुरु आहे.

- Advertisement -

या दुर्घटनेतील तिन्ही घरांमध्ये रेशन दुकान, भंगार दुकान आणि मिठाचे दुकान होते. रेशन दुकानावर दुरुस्तीचे काम चालू होते. याच रेशन दुकानाच्यावरती भंगाराची दोन घरे होती. तर मिठाच्या दुकानाच्यावर १ घर होते. मात्र ही घरं अचानक कोसळली. सुदैवाने यात कोणाही मृत्य़ूमुखी पडले नाही.

- Advertisement -

जखमींची नावे

१) सुरेंद्र मिश्रा (वय ५९ )

२) अमित मिश्रा (वय २४ )

३) पुनम शर्मा (वय २८) महिला

४) विलोन शर्मा (वय ४०)

५) दिव्या शर्मा ( वय ४५) महिला

६) विवान शर्मा (वय २ वर्षे) लहान मुलगा

या जखमींवर सायन रुग्णालायात उपचार सुरु आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -