International Womes Day ला हिजाब दिन घोषित करा, पाकिस्तानच्या मंत्र्याची पंतप्रधानांकडे मागणी

International Womes Day ला हिजाब दिन घोषित करा, पाकिस्तानच्या मंत्र्याची पंतप्रधानांकडे मागणी

कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयात सांगितले, "हिजाब घालण्याचा अधिकार घटनेच्या कलम 25 अंतर्गत येत नाही''

पाकिस्तान सध्या तयारी सुरू आहे ती म्हणजे ‘औरत मार्च’च्या निमित्ताने. येत्या ८ मार्च रोजी महिला दिनाच्या निमित्ताने हा औरत मार्च निघणार आहे. महिला सक्षमीकरण करतानाच हिजाबला प्रमोट करण्यासाठी तसेच पुराणमतवादी दृष्टीकोन लक्षात घेऊनच इम्रान खान सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू झाले आहेत. धोरण विषयावर काम करणाऱ्या एका (POREG) ग्रुपकडून याबाबतची घोषणा करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पाकिस्तानी महिलांकडून दरवर्षी औरत मार्चचे आयोजन करण्यात येते. धार्मिक विभागाचे मंत्री नुरूल हक कादरी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना ८ मार्च आंततराष्ट्रीय हिजाब दिन म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधानांनी केलेल्या दाव्यानुसार पाकिस्तानात २०१८ पासून काढण्यात येणारा औरत मार्च हा इस्लाम धर्माच्या तत्वांच्या विरोधात काढण्यात येत आहे. कादरी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या महिला दिनाच्या निमित्ताने सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक करण्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पावल उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोणत्याही संस्थेला इस्लाम धर्मातील मूल्यांना प्रश्न करण्याची किंवा मलीन करण्यासाठी परवानगी नसावी. मार्च किंवा कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम हा मुस्लिमांच्या भावनांना ठेस पोहचवणारा असा आहे, असा उल्लेख पत्रात आहे. कोणत्याही प्रकारच्या अधिकाराच्या नावाखाली अश्लील किंवा गुंडप्रवृत्ती फोफावता कामा नये. हा सगळा प्रकार मुस्लिम समाजाच्या विचारप्रणालीवर होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

पहिल्यांदा २०१८ मध्ये औरत मार्च पाकिस्तानात काढण्यात आला. मुस्लिम महिलांचे विषय मांडण्यासाठी तसेच महिलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला. पाकिस्तानातील महिलांची परिस्थिती मांडण्यासाठी औरत मार्चचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आला आहे. त्यामध्ये मुस्लिम महिलांनी या व्यासपीठाचा वापर करतानाच सोशल मिडिया आणि मैदानात उतरून जनजागृतीसाठी केला आहे.


 

First Published on: February 22, 2022 3:53 PM
Exit mobile version